---Advertisement---
गुन्हे रावेर

मोबाइलमध्ये गेम न खेळू दिल्याने १६ वर्षीय तरुणाची आत्महत्या

crime
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मे २०२१ । आईने मोबाइलमध्ये गेम न खेळू दिल्याच्या रागावरुन एका १६ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रावेर तालुक्यातील मुंजवाडी येथे घडली. संजय अशोक सूरदास (वय 16) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.

crime

संजय सूरदास हा घरात मोबाईलवर गेम खेळत असताना त्याच्या आईने मोबाईलवर नेहमी खेळत राहतो. काही कामधंदा कर असे म्हटले असता त्याचा मनात राग आला. आई शेतात गेली व शेतातून येऊन आंघोळ करीत असताना सजंयने घरातच गळफास घेतला. त्याला ग्रामीण रुग्णालय रावेर येथे दाखल केले असता मृत घोषित केले. 174 crpc प्रमाणे दाखल करून पुढील चौकशी हे कॉ सानप करीत आहे.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---