हतनूरचे 16 दरवाजे पूर्णपणे उघडले ; तापी नदी काठच्या लोकांना सतर्क राहण्याचा इशारा
जळगाव लाईव्ह न्यूज । २ सप्टेंबर २०२४ । हतनूर धरणाचे 16 दरवाजे आज सोमवारी सकाळी पूर्णपणे उघण्यात आले आहे. यावेळी 2400 क्युमेक्स (84756 क्युसेक्स) पाणी तापी नदी पात्रमध्ये सोडण्यात येत आहे. यामुळे तापीला पूर आला असून नदी काठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे हतनूर धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. यामुळे आज सकाळी ९ वाजेला हतनूर धरणाचे 16 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले.
पाण्याची आवक वाढत राहिल्यास धरणाची आणखी दरवाजे उघडण्यात येऊन पाण्याचा विसर्ग देखील वाढविण्यात येणार असल्याची माहिती शाखा अभियंता यांनी दिली आहे. धरणाचे 16 दरवाजे पूर्णपणे उघडले असून त्याद्वारे 2400 क्युमेक्स (84756 क्युसेक्स) पाणी तापी नदी पात्र मध्ये सोडण्यात येत आहे. यामुळे तापीला पूर आला असून तापी नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे