जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मार्च २०२२ । पोहण्याचा मोह एका १५ वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतला आहे. डोहातील चिखलात पाय रुतल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना चाळीसगाव तालुक्यातील तांबोळे येथे दि.१६ रोजी सायंकाळी घडली. अमजद अजनेर खॉं पठाण ( वय १५) असे मृत तरुणाचे नाव असून या घटनेने खळबळ उडाली आहे. दरम्यान, याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
काय आहे नेमकी घटना?
तांबोळे येथील अमजद अजनेर खॉं पठाण हा तांबोळे शिवारात शेळ्या चारण्याचे काम करतो. बुधवारी शेळ्या चारत असताना, तो डोहात पोहण्यासाठी गेला. परंतू पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाय चिखलात रुतला आणि त्यांच्या बुडून मृत्यू झाल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे.
त्याला लागलीत चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू डॉक्टरानी त्याला तपासून मृत घोषीत केले. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला वैद्यकिय आधिकारी यांच्या खबरीवरुन आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ.प्रविण सांगळे करीत आहेत.