जळगाव जिल्हा

Jalgaon : बांधकाम कामगारांची फसवणूक टाळण्यासाठी आता जिल्हयात १५ ‘तालुका कामगार सुविधा केंद्र’ सुरु

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

तालुका कामगार सुविधा केंद्रात कामगारांची नोंदणी, नुतनीकरण व लाभाचे अर्ज स्वीकारले जाणार

जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत बांधकाम कामगारांची नोंदणी, नुतनीकरण व त्यांना विविध कल्याणकारी योजनांचे लाभवाटपाचे कामकाज करण्यात येते. ही बांधकाम कामगार नोंदणीची प्रक्रिया फक्त १ रूपयात होत असतानाही ऑनलाईन नोंदणीच्या नावाखाली एजेंट बांधकाम कामगारांची फसवणूक करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. या फसवणूक प्रकरणाला आला बसावा यासाठी आता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने ऑनलाईन नोंदणीचे सर्व अधिकार स्वत:कडे घेतले आहेत.

प्रत्येक तालुक्याला एक याप्रमाणे जिल्हयात १५ ‘तालुका कामगार सुविधा केंद्र’ सुरु करण्यात आली आहे. यामुळे आता कामगाराला तालुक्याच्या ठिकाणी कार्यालयात स्वतः जाऊन नोंदणी, नुतनीकरण व लाभाचे अर्ज सादर करावे लागणार आहे. यामुळे फसवणुकीच्या प्रकरणाला आळा बसणार आहे.

तालुका कामगार सुविधा केंद्रात कामगारांची नोंदणी, नुतनीकरण व लाभाचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. तालुका कार्यालयात आवश्यक ती कागदपत्रे सादर केल्यानंतर संबंधित कामगाराचे अंगठ्याचे ठसे व प्रत्यक्ष फोटो घेऊन तो कामगार पात्र ठरला की अपात्र हे त्याच ठिकाणी सांगितले जाणार आहे.

ही सर्व नोंदणी प्रकिया मोफत असून एजंट/त्रयस्थ व्यक्ती यांच्या अमिषाला अथवा भूलथापांना बळी न पडता थेट कामगारांनी तालुका कार्यालयात जाऊन १/- रूपया नोंदणी फी भरुन नोंदणी करावी. व एजंट/त्रयस्थ व्यक्तींनी पैशाची मागणी केल्यास त्यांच्या विरोधात जवळच्या पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करावी, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त डॉ. रा.दे. गुल्हाने यांनी एका प्रसिद्धीपत्रद्वारे केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button