⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | अरे वा : जळगाव जिल्ह्यात या ठिकाणी झाली 149 पक्षी प्रजातींची नोंद

अरे वा : जळगाव जिल्ह्यात या ठिकाणी झाली 149 पक्षी प्रजातींची नोंद

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


जळगाव लाईव्ह न्यूज । १४ फेब्रुवारी २०२३ । वनपरिक्षेत्र अधिकारी, मुक्ताईनगर व चातक निसर्ग संवर्धन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हतनुर धरणाच्या जलाशयावर आशियाई पाणपक्षी गणना 12 फेब्रुवारी, 2023 रोजी पार पडली.

या पक्षी गणनेत जळगाव वनविभागाचे उपवनसंरक्षक विवेक होशिंग, वनपरिक्षेत्र अधिकारी, मुक्ताईनगर कृपाली शिंदे, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील, चातक निसर्ग संवर्धन संस्थेचे अध्यक्ष अनिल महाजन, शिल्पा गाडगीळ, उदय चौधरी, सौरभ महाजन, सत्यपालसिंग, समीर नेने, संजय नेने, राहुल चव्हाण, पार्थ बऱ्हाडे यांचेसह 35 पक्षी निरीक्षकांनी सहभाग नोंदविला असे उपवनसंरक्षक होशिंग यांनी कळविले आहे.


उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या या पाणपक्षी गणनेच्या दिवशी 149 पक्षी प्रजाती आढळून आल्या. त्यामध्ये हतनूर धरणाचे मानचिन्ह असलेले मोठी लालसरी, त्याचप्रमाणे वारकरी, वैष्णव, तलवार बदक, शेंडी बदक, भिवई बदक, दलदली हरीण पक्षी, ठिपकेदार होला इ. पक्षी मोठ्या प्रमाणात दिसून आले.

चांगदेव, खामखेडी, मेहून, चिंचोल, हतनूर, तांदलवाडी या 5 ठिकाणी पक्षी गणना करण्यात आली. हतनूर धरण परिसरातील नदीपात्रात बोटींमधून भ्रमंती करून दुर्बीण व कॅमेऱ्याच्या साहाय्याने स्थलांतरित देशी-विदेशी पक्षांचा अभ्यास केला गेला. देश-विदेशातून येणाऱ्या स्थलांतरित पक्षांची मोठी संख्या पाहता हतनूर धरण जलाशयास ‘महत्वपूर्ण पक्षी जैवविविधता अधिवास क्षेत्र’ (IBA) हा आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह