संतापजनक ! १४ वर्षीय मुलीवर गावातीलच तरुणाचा अत्याचार

फेब्रुवारी 18, 2022 10:15 AM

ळगाव लाईव्ह न्यूज । ८ जानेवारी २०२२ । अत्याचाऱ्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येतेय. अशात गावातीलच एका १८ वर्षीय तरुणाने १४ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना चोपडा तालुक्यातील एका गावातून समोर आली आहे. याबाबत संशयित नराधम धीरज रविंद्र फुगारे (वय-१८) याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 3 jpg webp

चोपडा तालुक्यातील एका गावात १४ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ती आठवीचे शिक्षण घेत आहे. गुरूवार ६ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता अल्पवयीन मुलगी घरी एकटी असतांना गावातील संशयित आरोपी धीरज रविंद्र फुगारे (वय-१८) हा घरात आला. मला फोन का लावत नाही असे म्हणून पहिल्यांदा मुलीचा विनयभंग केला.

Advertisements

त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी पिडीत अल्पवयीन मुलीने हा प्रकार नातेवाईकांना सांगितला. त्यानंतर अडावद पोलीस ठाण्यात धाव घेतली. पीडीत मुलीच्या फिर्यादीवरून अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील करीत आहे.

Advertisements

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now