प्रवाशांनो लक्ष द्या ! रेल्वेने 133 गाड्या रद्द केल्या, भुसावळ विभागातून धावणाऱ्या अनेक गाड्यांचा समावेश
जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑक्टोबर २०२२ । रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. तुम्हीही आज ट्रेनने प्रवास करणार असाल तर सर्वात आधी तुमच्या ट्रेनची स्थिती तपासा. भारतीय रेल्वेने विविध कारणांमुळे देशभरात धावणाऱ्या 133 गाड्या रद्द केल्या आहेत. यात भुसावळ विभागातून धावणाऱ्या अनेक गाड्यांचा समावेश आहे. त्यामुळे घर सोडण्यापूर्वी, तुमची ट्रेन रद्द झाली आहे, वळवली गेली आहे की पुन्हा शेड्यूल केली आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे?
गाड्या रद्द, वळवल्या किंवा पुन्हा वेळापत्रक
भारतीय रेल्वेने नॅशनल ट्रेन इन्क्वायरी सिस्टमच्या वेबसाइटवर रद्द केलेल्या गाड्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. वेबसाईटनुसार, रेल्वेने विविध कारणांमुळे देशाच्या विविध भागात ट्रेन न चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये अनेक विशेष गाड्यांचाही समावेश आहे. सणासुदीच्या काळात गाड्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.
कोणती ट्रेन रद्द झाली
रेल्वेने 133 गाड्या रद्द केल्या आहेत, 16 गाड्यांचे वेळापत्रक बदलले आहे आणि 10 गाड्या वळवल्या आहेत. या यादीत भुसावळ विभागातून धावणाऱ्या गोंदिया कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेसह विविध गाड्यांचा समावेश आहे. ताज्या अपडेट्ससाठी तुम्ही रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट https://enquiry.indianrail.gov.in/mntes/ ला भेट देऊ शकता.
या रद्द केलेल्या गाड्या वेबसाइटवर अशा प्रकारे तपासा
सर्वप्रथम तुम्हाला enquiry.indianrail.gov.in/mntes/ या वेबसाइटवर जावे लागेल.
स्क्रीनच्या उजव्या बाजूला तुम्हाला Exceptional Trains लिहिलेले दिसेल. तिथे क्लिक करा.
त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला रद्द केलेल्या ट्रेन्सच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
येथे तुम्हाला तारीख टाकावी लागेल आणि Go वर क्लिक करावे लागेल. येथे तुम्हाला रद्द झालेल्या गाड्यांची यादी दिसेल.
रद्द केलेल्या गाड्यांची संख्या
01539 , 01540 , 01605 , 01606 , 01607 , 01608 , 01609 , 01610 , 01885 , 01886 , 02132 , 03085 , 03086 , 03087 , 03094 , 04181 , 04182 , 04194 , 04551 , 04601 , 04602 , 04647 , 04648 , 04685 , 04686 , 04699 , 04700 , 05010 , 05031 , 05032 , 05091 , 05092 , 05366 , 05453 , 05454 , 05459 , 05460 , 05517 , 05518 , 05591 , 05592 , 06663 , 06664 , 06977 , 07458 , 07461 , 07576 , 07795 , 07906 , 07907 , 09089 , 09108 , 09109 , 09110 , 09113 , 09144 , 09159 , 09175 , 09176 , 09349 , 09350 , 09391 , 09392 , 09393 , 09394 , 09395 , 09396 , 09483 , 09484 , 09570 , 10101 , 10102 , 11039 , 11040 , 11042 , 12114 , 13309 , 13310 , 13344 , 13345 , 14203 , 14204 , 14213 , 14214 , 19405 , 19406 , 20927 , 20928 , 20948 , 20949 , 22140 , 22152 , 22171 , 31411 , 31414 , 31711 , 31712 , 33742 , 33743 , 36033 , 36034 , 37211 , 37216 , 37246 , 37247 , 37253 , 37256 , 37305 , 37306 , 37307 , 37308 , 37319 , 37327 , 37330 , 37338 , 37343 , 37348 , 37411 , 37412 , 37415 , 37416 , 37611 , 37614 , 37657 , 37658 , 37782 , 37783 , 37785 , 37786 , 93015 , 93024