⁠ 
रविवार, मे 5, 2024

ब्लॉकमुळे आज भुसावळमार्गे धावणाऱ्या ‘या’ 13 गाड्यांचा होणार खोळंबा, स्टेशनवर जाण्यापूर्वी जाणून घ्या

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑगस्ट २०२३ । रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. भुसावळ विभागातील दुसखेडा (ता.यावल) रेल्वे स्थानकातील अप, डाउन लूप लाइनच्या कामासाठी आज शुक्रवारी (दि.२५) दुपारी २ ते सायंकाळी ५ पर्यंत विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेतला आहे. यामुळे अप – डाऊन मार्गावरील १३ प्रवासी गाड्या विविध स्थानकांवर २० मिनिटे ते ३ तास कालावधीसाठी थांबवण्यात येतील. तर आग्रा-नांदेड एक्स्प्रेस इटारसी, नरखेड, बडनेरा, अकोला मार्गे वळवली आहे.

दुसखेडा स्थानकातील ब्लॉक दरम्यान रेल्वे प्रशासनाकडून विभागातील विविध स्थानकांवर गाड्यांना ३ तासांपेक्षा जास्त वेळ थांबा मिळेल. यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ शकते. त्यात अप मार्गावर सीतापूर – एलटीटी एक्स्प्रेस सावदा स्टेशनवर ३ तास, वाराणसी – म्हैसूर एक्स्प्रेस निंभोरा स्टेशनवर २.५५ तास, ११०७२ वाराणसी – एलटीटी कामायनी एक्स्प्रेस रावेरला २.४५ तास, गोरखपूर – पुणे एक्स्प्रेस वाघोड स्टेशनवर २ तास, अमृतसर – मुंबई एक्स्प्रेस बऱ्हाणपूरला १.३० तास, २२५३७ गोरखपूर – एलटीटी एक्स्प्रेस असिरगढला १ तास, जयनगर – एलटीटी एक्स्प्रेस चांदनी स्टेशनवर ५० मिनिटे, कटनी – भुसावळ एक्स्प्रेस नेपानगरला २० मिनिटे थांबवण्यात येईल.

अप मार्गाप्रमाणेच डाउन मार्गावरील गाड्या भुसावळ,जळगावला थांबवल्या जातील. एलटीटी – गोरखपूर एक्स्प्रेस भुसावळला २.५० तास, एलटीटी – दिब्रुगड एक्सप्रेस भुसावळला १.५५ तास,मुंबई – लखनऊ एक्सप्रेस भुसावळला १.४५ तास, म्हैसूर – वाराणसी एक्स्प्रेस भादली स्टेशनवर १.४० तास, सूरत – छपरा एक्स्प्रेस जळगावला १.४० तास थांबवण्यात येईल.