पाल पोलिसांनच्या कारवाईत १३ गुरांची सुटका
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑक्टोबर २०२१ । रावेरच्या दिशेने जाणाऱ्या दोन महेंद्र पिकअप गाड्यांना पाल पोलिसांनी पकडले असता गुरांना ते कत्तलिच्या उद्दीष्टाने कोंबुन नेले जात असल्याची प्राथमिक माहिती आहे. हि कारवाई फौजदार राजेंद्र राठोर, पो. कॉ. दिपक ठाकुर, व पो. कॉ. नरेंद्र बाविस्कर यांच्या पथकाने केली आहे. त्यात १३ गुरांची सुटका करण्यात आली असून, त्यांना जळगाव येथील बाफना गौ-शाळेत रवाना केले आहे.
सविस्तर असे की, पाल पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन मोरव्हाल नजिक सापळा रचुन दोन महेंद्र पिकअप एम.एच ०४ जि.एफ १८६० व एम.एच ०४ जि.एफ ८७६७ या दोन्ही गाड्या पकडण्यात आल्या. या दोन्ही गाड्यांमधून सुमारे १३ गुरांची सुटका करण्यात आली आहे. या गुरांना कत्तलीच्या उद्दीष्टने कोंबुन नेले जात असल्याची प्राथमिक माहिती आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई फौजदार राजेंद्र राठोर, पो. कॉ. दिपक ठाकुर, व पो. कॉ. नरेंद्र बाविस्कर यांच्या पथकाने केली आहे. मध्य प्रदेशातुन मोठ्या प्रमाणात पाल मार्गे गुरांची तस्करी होत असते याचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी पशुप्रेमी करत आहे.