⁠ 
रविवार, सप्टेंबर 8, 2024
Home | गुन्हे | जळगावात मागील दहा वर्षात 125 जणांकडे बंदुका! ‘या’ जिल्हाधिकाऱ्यांनी दिले सर्वात जास्त शस्त्र परवाने

जळगावात मागील दहा वर्षात 125 जणांकडे बंदुका! ‘या’ जिल्हाधिकाऱ्यांनी दिले सर्वात जास्त शस्त्र परवाने

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज। २० जुलै २०२३। जळगाव जिल्ह्यात मागील १० वर्षात तब्बल १२५ शस्त्र परवान्यांचे वाटप झाल्याची माहिती समोर येत आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते दिपककुमार गुप्ता यांनी ही माहिती मिळविली आहे. २०१३ ते मे २०२३ या कालावधीत किती शस्त्र परवाने वाटप झाले, याची माहिती त्यांनी मागविली होती. जिल्हाधिकारी कार्यालयातील जण माहिती अधिकारी यांनी ती माहिती गुप्ता यांना दिली.

तत्कालीन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल आणि अभिजित राऊत यांच्या कार्यकाळात सर्वाधिक परवाने देण्यात आले आहेत. तर जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या दहा महिन्यांच्या कार्यकाळात ९ जणांना शस्त्र परवाने देण्यात आले आहेत.तर तत्कालीन जिल्हाधिकारी डी. एस. राजूरकर, किशोरराजे निंबाळकर यांनी सर्वात कमी शस्त्र परवाने दिले आहेत. तर तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी फक्त एकच शस्त्र परवाना दिला आहे.

२०२३ मध्ये जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी एकाच घरात दोन शस्त्र परवाने दिले आहेत. परवानाधारक खुलेआम शस्त्र मिरवत आहे. सार्वजनिक ठिकाणी ते शस्त्र परवाने शस्त्र बाळगत आहेत. त्यातून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे परवाना रद्द करण्याची मागणी गुप्ता यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. तसेच ते यासंदर्भात शासन व न्यायालयाकडे तक्रार करणार आहे.

गेल्या दहा वर्षात सर्वाधिक शस्त्र परवाने राजकारण्यांच्या घरात दिसून येते. त्यात सर्वपक्षीय नेते, काही उद्योजक तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचाही समावेश आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह