कासोद्यात पोलिसांची धडाकेबाज कामगिरी: ‘ऑपरेशन हातभट्टी’ अंतर्गत १२०० लिटर अवैध दारू नष्ट

एप्रिल 13, 2026 10:25 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२६ । कासोदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध गावठी हातभट्टी दारू व्यवसायावर पोलिसांनी पहाटेच्या सुमारास धडक कारवाई करत मोठा फटका दिला. ‘ऑपरेशन हातभट्टी’ अंतर्गत ताडे, आडगाव, निपाणे व नांदखुर्द बु. परिसरातील बेकायदेशीर अड्ड्यांवर एकाच वेळी छापे टाकून तब्बल १२०० लिटर रसायन व तयार दारू जागेवरच नष्ट करण्यात आली. या कारवाईने अवैध हातभट्टी व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

hatbhatti

मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, कासोदा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि श्रीकांत पाटील यांनी अत्यंत बारकाईने नियोजन करून चार स्वतंत्र पथके तयार केली होती. या पथकांनी समन्वय साधत पहाटेच्या सुमारास ताडे, आडगाव, निपाणे व नांदखुर्द बु. परिसरात एकाच वेळी छापे टाकले.

या कारवाईत हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन, साहित्य आणि तयार दारू असा सुमारे ६० हजार रुपयांचा मुद्देमाल उद्ध्वस्त करण्यात आला. याप्रकरणी कासोदा पोलीस स्टेशनमध्ये अवैध दारूसंदर्भात ४ गुन्हे दाखल करण्यात आले असून संबंधितांवर कडक कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.

ही मोहीम पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या धडक कारवाईत पोलीस कर्मचारी रामकृष्ण पाटील, नंदलाल परदेशी, किरण गाडीलोहार, अकिल मुजावर, योगेश पाटील, लहु हटकर, कुणाल देवरे व सोनु पाचुंदे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

कासोदा पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध हातभट्टी व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून “कायद्याच्या विरोधात जाणाऱ्यांना कुठेही आश्रय नाही” असा ठाम ‘झिरो टॉलरन्स’ संदेश प्रशासनाने दिला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now