जळगाव जिल्हा

एसटीचे १२ कर्मचारी निलंबित, मेस्मानुसार होणार कारवाई

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ डिसेंबर २०२१ । राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या संप सुरु आहे. मात्र, काही कर्मचारी संपातून कामावर परतले. अशा कर्मचाऱ्यांना विरोध करणाऱ्यांवर महामंडळातर्फे निलंबनाची कारवाई सुरु आहे. त्यानुसार शुक्रवारी संपतील १२ कर्मचार्यांवर कारवाई करण्यात आली. तसेच कर्मचाऱ्यांनी संप सुरूच ठेवल्यामुळे या कर्मचाऱ्यांवर मेस्मा कायदा अंतर्गत कारवाई करण्यासाठी तयार राहण्याच्या सूचना परिवहनमंत्र्यांनी दिल्या.असल्याचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी सांगितले,

एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाच्या मागणीवर तोडगा काढण्यासाठी परिवहनमंत्र्यांनी गेल्या आठवड्यात वेतनवाढ देऊनही, कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू न होता संप सुरूच ठेवला आहे. कारवाईचा इशारा दिल्यानंतरही हे कर्मचारी कामावर हजर होत नसल्यामुळे, परिवहन मंत्री अनिल परब यांनी शुक्रवारी संपातील कर्मचाऱ्यांवर मेस्मा कायदा अंतर्गत कारवाईचा इशारा दिला आहे.

याबाबत त्यांनी शुक्रवारी सायंकाळी राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांची ऑनलाइनद्वारे बैठक घेऊन कारवाईसाठी तयार राहण्याच्या सूचनाही केल्या आहेत. जसे आदेश येतील, त्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे जगनोर यांनी सांगितले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button