वाणिज्य

मोदी सरकारचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; दूध, कपडे ते .. ; ‘या’ वस्तू स्वस्त होणार?

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जुलै २०२५ । मागच्या काही काळापासून अनेक जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. मात्र यातच केंद्रातील मोदी सरकार लवकरच सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार जीएसटी दर कमी करू शकते. असे सांगितले जात आहे की, जीएसटी परिषदेच्या बैठकीत १२ टक्के टॅक्सचा स्लॅब रद्द केला जाऊ शकतो.

१२ टक्के जीएसटी स्लॅबमध्ये येणाऱ्या काही वस्तूंचा १८ टक्के जीएसटी स्लॅबच्या यादीत समावेश केला जाऊ शकतो. तर दैनंदिन जीवनात लागणाऱ्या आवश्यक वस्तूंचा समावेश ५ टक्क्यांच्या स्लॅबमध्ये समावेश केला जाऊ शकतो. सरकराने १२ टक्के जीएसटी स्लॅब रद्द केल्यास अनेक वस्तू स्वस्त होऊ शकतात.

जर सरकारने हा निर्णय घेतला तर शूज, चप्पल, मिठाई, कपडे, साबण, टूथपेस्ट आणि दुग्धजन्य पदार्थ दूध, दही पनीर यासारख्या अनेक वस्तू जे अजूनही १२ टक्के स्लॅबमध्ये आहेत ते स्वस्त होऊ शकतात. याशिवाय चीज, खजूर, सुकामेवा, पास्ता, जाम, पॅकेज्ड फ्रूट ज्यूस, मुरांबा, चटणी, जेली, नारळ पाणी, मोबाईल, फळांचा रस, भाज्या, फळे, लोणचे, १००० रुपयांहून अधिक किंमतीचे कपडे, १००० रुपयांपर्यंतचे बुट इत्यादी वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे.

१२ टक्के जीएसटी स्लॅबमध्ये येणाऱ्या सेवा
हॉटेल रुम, (प्रति रात्र भाडे ७५०० रुपयांपर्यंत),नॉन इकोनॉमिक क्लास (हवाई प्रवास) , काही मल्टिमॉडल ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस आणि कमर्शियल सेवा इत्यादी सेवांचा समावेश आहे.याबाबतचा अंतिम निर्णय जीएसटी परिषदेत घेण्यात येणार आहे.

सध्या भारतात जीएसटीचे ४ प्रकारचे जीएसटी स्लॅब आहेत. ५ टक्क्यांच्या जीएसटी स्लॅबमध्ये येणाऱ्या वस्तू कमी आहेत. त्यानंतर १२ टक्के जीएसटी स्लॅब रद्द करण्याचा विचार सरकारकडून सुरु आहे. १८ टक्के आणि २४ टक्क्यांचा जीएसटी स्लॅब कायम असणार आहे. सध्या महागाई कमी करण्यासाठी सरकारने १२ टक्क्यांचा जीएसटी स्लॅब रद्द करण्याचा विचार सुरु केला आहे .

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button