जळगाव शहर

जळगाव विभागातील १२ कर्मचारी बडतर्फ, आतापर्यंत १८४ कर्मचाऱ्यांना निलंबित

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ फेब्रुवारी २०२२ । एसटीचे शासनात विलिनीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी संपावर असलेल्या कर्मचार्‍यांवर एसटी प्रशासनाने कारवाईचे सत्र सुरूच ठेवले आहे. शुक्रवारी जळगाव विभागातील १२ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले.आधी कर्मचाऱ्यांचे निलंबन, नंतर सेवा समाप्ती व आता संपास कारणीभूत असल्याचा ठपका ठेवत १२ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले.तसेच आतापर्यंत २३२ कर्मचाऱ्यांना बडतर्फीची नोटीस बजावण्यात आली आहे. एकीकडे संप सुरूच असून दुसरीकडे संपकरी कर्मचाऱ्यांना कारवाईची टांगती तलवार कायम याहे.

एसटीच्या विलीनीकरणावरून गेल्या तीन महिण्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे. यात प्रशासनाने कर्मचाऱ्यांना कामावर परत येण्याचे आवाहन करूनही कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम होते. त्यामुळे विभागातील काही कर्मचाऱ्यांना निलंबित, सेवा समाप्ती करण्यात आली. या कर्मचाऱ्यांना अनेकदा आपली बाजूही मांडण्याची संधी दिली. मात्र, या कर्मचाऱ्यांनी प्रशासकीय कारवाईस अवैध ठरवत तसेच दुखवट्यात असल्याचे कारण सांगून प्रशासकीय चौकशीस नकार दिला. त्यामुळे एसटी प्रशासनाने आपणास बडतर्फ का करण्यात येऊ नये, अशी नोटीस बजावली होती. तरीही संबंधित कर्मचाऱ्यांकडून खुलासा न मिळाल्याने प्रशासनाने शुक्रवारी १२ तर आतापर्यंत विभागातील १८४ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. या १२ बडतर्फ कर्मचाऱ्यांमध्ये ३ चालक, ७ वाहक, यांत्रिक कर्मचारी २ अशा १२ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

२३२ बडतर्फची नोटीस बजावलेले कर्मचारी
१८४ बडतर्फ करण्यात आलेले कर्मचारी
अशी झाली आहे कर्मचाऱ्यांवर कारवाई
४०३ निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या
८६ सेवा समाप्ती झालेले कर्मचारी
३९ प्रशासकीय बदल्या झाल्या

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button