वरणगाव पालिका निवडणुकीमध्ये 2 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात

डिसेंबर 11, 2025 2:00 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकीच्या सुधारीत कार्यक्रमात १२ जागांसाठी २० रोजी निवडणूक होत असून काल १० डिसेंबर रोजी माघारीचा अखेरचा दिवस होता. माघारीची मुदत संपल्यानंतर वरणगाव पालिका निवडणुकीमध्ये २ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात उभे राहिले आहेत.

varangaon parishad

वरणगाव शहरातील प्रभाग क्रमांक १० मधील ‘अ’ आणि ‘क’ जागेवरील निवडणूक स्थगित झाल्यानंतर आता नव्या निर्धारित कार्यक्रमानुसार चुरशीची लढत रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. प्रभाग क्रमांक १० मध्ये सुमारे ४५०० मतदार असून, ‘अ’ जागेसाठी ७ उमेदवार, तर ‘क’ जागेसाठी ४ उमेदवार मैदानात आहेत.

Advertisements

दोन उमेदवार न्यायालयात गेल्यानंतर निवडणूक रद्द करून नवा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. जिल्हाधिकारी यांनी ४ डिसेंबरला निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध केला होता, तर १० डिसेंबर हा माघारीचा दिवस होता. या प्रभागातील लढतीला विशेष रंग चढण्याचे आणखी एक कारण म्हणजे अपक्ष निवडणूक लढवणारे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या मातोश्री रुक्मिणी काळे याच प्रभागातून लढत आहे.

Advertisements

त्यामुळे सर्वच पक्षांनी त्यांना पराभूत करण्यासाठी कंबर कसली आहे. दुसरीकडे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतून मोकळे झाल्यानंतर सुनील काळे यांनी देखील आपल्या प्रभागात जोर लावला असून, प्रचाराला वेग दिला आहे. यामुळे प्रभाग क्रमांक १० मधील दोन्ही जागांची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असून मतदारांमध्ये उत्सुकता वाढली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now