युवासेनेतर्फे आयोजित शिबीरात ११८ रक्तपिशव्या संकलीत
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ नोव्हेंबर २०२१ । हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९ व्या स्मृतिदिनानिमित्त काव्यरत्नावली चौक येथे युवासेनेच्यावतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात ११८ नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून बाळासाहेबांना अभिवादन केले.
शिबीराच्या सुरुवातीला बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुजन व माल्यार्पण करून करण्यात आले. त्यानंतर महापौर जयश्री महाजन व माजी महापौर नितिन लढ्ढा यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी महानगरप्रमुख शरद तायडे, जिल्हा परिषद सदस्य प्रताप पटील, युवासेना सहसचिव विराज कावडीया, युवासेना विस्तारक किशोर भोसले, युवासेना जिल्हा युवाधिकारी शिवराज पाटील, महिला आघाडी महानगर प्रमुख शोभा चौधरी, नगरसेवक नितिन बरडे, सरिता माळी-कोल्हे, युवासेना उपजिल्हाप्रमुख विकास पाटील, अतुल चौधरी, उप जिल्हा युवाधिकारी पियुष गांधी, समन्वयक जितेंद्र बारी, युवासेना महानगर युवा अधिकारी स्वप्निल परदेशी, विशाल वाणी, उपमहानगर युवाधिकारी यश सपकाळे, गिरीष सपकाळे, सागर हिवराळे, तालुका प्रमुख सचिन चौधरी, उपतालुकाप्रमुख अतुल घुगे, विधानसभा क्षेत्र प्रमुख विजय लाड, राकेश चौधरी, निलेश वाघ, आकाश पाटील, अनिल पाटील, महेश सानप, विभाग युवाधिकारी तेजस दुसाने, चेतन कापसे आदी उपस्थित होते.
शिबीरात प्रथम रक्तदाते म्हणून गुणवंत सोनवणे यांनी रक्तदान केले. शिबिरासाठी इंडियन रेडक्रॉस सोसायटी संचलित रक्तपेढीच्या जनसंपर्क अधिकारी उज्वला वर्मा, डॉ. शंकरलाल सोनवणे, सिमा शिंदे, उमाकांत शिंपी यांचे सहकार्य लाभले. यशस्वीतेसाठी युवासैनिक अमित जगताप, प्रितम शिंदे, उमाकांत जाधव, राहूल ठाकूर, पवन चव्हाण, मयूर जाधव, परेश चोपडा, सागर सोनवणे, पियुष हसवाल, भुषण सोनवणे, संदिप सुर्यवंशी आदींनी परिश्रम घेतले.