⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 19, 2024
Home | हवामान | या तारखेपासून राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात ; हवामान खात्याचा अंदाज

या तारखेपासून राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात ; हवामान खात्याचा अंदाज

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ०४ जुलै २०२१ । राज्यात मागील गेल्या काही दिवसापासून पावसाने दडी मारली आहे. राज्यातील काही ठिकाणी सुरुवातीला मान्सूनने चांगली जोरदार हजेरी लावली. परंतु गेल्या काही दिवसापासून राज्यभरात दडी मारून बसलेला पाऊस लवकरच पुनरागमन करणार आहे. ११ जुलैनंतर राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

जून महिन्यात पावसाने राज्यात काही ठिकाणी जोरदार हजेरी लावली. पावसाच्या पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांनी पेरणी करून घेतली. परंतु मागील काही दिवसापासून राज्यात पावसाने पाठ फिरवल्याने बळीराजा पावसाच्या प्रतिक्षेत आहे. पावसाचा मोठा खोळंबा झाल्यामुळे राज्यातील शेतकर्‍यांच्या चिंतेत वाढ झाली असून पहिली पेरणी वाया गेल्याने दुबार पेरण्यांच्या संकटाने बळीराजाचा जीव मेटाकुटीला आला आहे. 

जुलै हा एकच महिना धो धो पावसाचा असल्याने तो तसा झाला नाही तर शेती आणि पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट राज्यासमोर उभे राहू शकते. मान्सून येऊनही मागील दोन आठवडे राज्यात खूपच कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे चांगल्या पावसासाठी राज्यातील शेतकर्‍यांना आणखी एक आठवडा वाट पहावी लागणार आहे.  

दरम्यान, पुढील चार दिवस कोकणात कोठेही मोठ्या पावसाची शक्यता नाही. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. ६ व ७ जुलै रोजी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस होऊन तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. मराठवाडा व विदर्भात पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असून काही ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 

पुढील २ आठवड्यांचा पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आला आहे त्यात पहिल्या आठवड्यात (२ ते ८ जुलै) कोकणात सरासरीपेक्षा कमी, मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी ते सरासरी इतका, मराठवाड्याच्या पूर्व भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे.

दुसऱ्या आठवड्यात (९ ते १५ जुलै) पावसाला सुरुवात होणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. पश्चिम विदर्भात अधिक तर पूर्व विदर्भात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.