⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

छत्तीसगडमधील दंतेवाडामध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 11 जवान शहीद

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२३ । छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे बुधवारी झालेल्या नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 11 जवान शहीद झाले आहे. यात एका चालकाचा समावेश आहे. हे 10 जवान जिल्हा राखीव रक्षक (DRG) चे होते.

अरणपूरमध्ये नक्षलवाद्यांच्या या हल्ल्यानंतर सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. हे जवान पेट्रोलिंग करून परतत होते, त्यानंतर नक्षलवाद्यांनी वाहनाला आयईडीने उडवले. मिळालेल्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांचा सामना करण्यासाठी अतिरिक्त फौजफाटा मागवण्यात आला आहे

दरम्यान, या हल्ल्याबाबत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याकडून फोनवर माहिती घेतली आहे. त्यांनी मुख्यमंत्री बघेल यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिलं आहे. बस्तरचे आयजी सुंदरराज यांनी सांगितले की, जवान ऑपरेशनसाठी जात होते. दरम्यान, अरणपूरच्या पालनार भागात नक्षलवाद्यांनी आयईडीने जवानांनी वाहन उडवल्याचं, आयजी सुंदरराज यांनी सांगितलं. नक्षलवाद्यांच्या हल्ल्याची पद्धत अजिबात बदललेली नाही.