चोपड्यात फी बाकी असल्यामुळे 10वीच्या विद्यार्थिनीला हॉल तिकीट नाकारले

फेब्रुवारी 20, 2026 2:40 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० फेब्रुवारी २०२६ । महाराष्ट्र सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गातील विद्यार्थिनींचे शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय अलीकडेच घेतला आहे. तरी देखील अनेक शाळांकडून अवैध फी वसुली केली जात असल्याच्या तक्रारी आहेत.

chopda

अशातच फी बाकी असल्यामुळे दहावीच्या विद्यार्थिनीला हॉल तिकीट नाकारल्याचा प्रकार चोपड्यातील कस्तुरबा माध्यमिक विद्यालयात घडला. फी बाकी असल्यामुळे विद्यार्थिनीला हॉल तिकीट दिले नाही, अशी तक्रार तिच्या पालकांनी केली. पालकांच्या हस्तक्षेपानंतर विद्यार्थिनीला हॉल तिकीट देण्यात आलं आहे.

Advertisements

आजपासून राज्यातील बोर्डाच्या दहावी परीक्षेला सुरुवात झाली आहे. मात्र चोपडा येथील कस्तुरबा माध्यमिक विद्यालयात फी बाकी असल्या कारणाने दहावीच्या विद्यार्थिनीला हॉल तिकीट देण्यास नकार दिल्याचा प्रकार समोर आला आहे. विद्यार्थिनी परीक्षेत बसू शकत नसल्याने पालकांनी त्वरित शाळा गाठली. विद्यार्थिनीच्या पालकांनी स्थानिक पत्रकारांना बोलवून ही घटना समोर आणली. त्यानंतर तातडीने विद्यार्थिनीला हॉल तिकीट देण्यात आले आणि ती परीक्षेत बसली.

Advertisements

या घटनेनंतर पालकांनी शाळेच्या या निर्णयाची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे याचिका केली आहे. पालकांचा आरोप आहे की, केवळ फी बाकी असल्यामुळे हॉल तिकीट न देणे विद्यार्थिनीच्या भविष्यासाठी धोकादायक आहे आणि शाळेच्या या वर्तनावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.

शाळा प्रशासनाने अद्याप या प्रकरणावर अधिकृत टिप्पणी दिलेली नाही, परंतु पालकांचा आरोप आणि स्थानिक माध्यमांवर माहिती पोहोचल्यामुळे प्रशासनाच्या लक्षात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now