⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

10वी पास उमेदवारांसाठी खुशखबर! कॉन्स्टेबल पदाच्या 24369 जागांसाठी मेगाभरती सुरु..

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । नोकरीच्या शोधात असलेल्या 10 पास उमेदवारांसाठी एक खुशखबर आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने GD कॉन्स्टेबल भरतीची अधिसूचना (SSC GD Constable Bharti 2022) जारी केली आहे. यावेळी कॉन्स्टेबलच्या एकूण 24,396 पदांची भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. इच्छुक आणि पात्र उमेदवार ssc.nic.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे. ऑनलाइन फी जमा करण्याची शेवटची तारीख १ डिसेंबर आहे. SSC GD Constable Recruitment 2022

एकूण पदसंख्या : 24,396

रिक्त पदांचा तपशील
BCF – १०,४९७ पदे
CISF- १० पदे
CRPF – ८,९११ पदे
SSB – १,२८४ पदे
ITBP – १६१३ पदे
आसाम रायफल्स – १६९७ पदे
SSF- १०३ पदे
NCB – १६४ पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा.
वयाची अट: 01 जानेवारी 2023 रोजी 18 ते 23 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क : 100 रुपये [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

यावेळी जीडी कॉन्स्टेबल भरतीची लेखी परीक्षा पूर्वीपेक्षा वेगळी असेल. जिथे आधी दीड तासाचा पेपर असायचा तिथे आता पेपर एक तासाचा होणार आहे. आता पेपरमध्ये 100 ऐवजी 80 प्रश्न विचारले जाणार आहेत. निगेटिव्ह मार्किंग पूर्वीप्रमाणेच असेल, पण आधी चुकीच्या उत्तरासाठी चतुर्थांश मार्क कापले जायचे, आता अर्धे मार्क कापले जातील.

पगार :
वेतन स्तर-1 NCB (18000-56900) आणि इतर पदांसाठी वेतन स्तर-3 (21,700-69,100) आहे.

शारीरिक पात्रता:
लांबी
पुरुष उमेदवार – 170 सें.मी.
महिला उमेदवार – 157 सेमी.
छाती – पुरुष उमेदवार – 80 सें.मी. (फुगवलेले – 85 सेमी

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा