जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मार्च २०२१ । जळगाव जिल्ह्यात पहिला कोरोना बाधित रूग्ण सापडण्यास उद्या दिनांक २७ मार्च रोजी एक वर्ष पूर्ण होत आहेत. जिल्ह्यात गेल्या वर्षभरात दररोज आढळून आलेले बाधित रूग्ण, कोरोनामुक्त झालेले रूग्ण व मृत्यू याबाबतची माहिती आपण जाणून घेऊ.

* जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूचा पहिला बाधित रूग्ण 28 मार्च 2020 रोजी सापडला.
* जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे बाधित पहिल्या रूग्णाचा मृत्यु 2 एप्रिल 2020 रोजी झाला आहे.
* जिल्ह्यात पहिला बाधित रूग्ण 11 एप्रिल 2020 कोरोनामुक्त झाला आहे.
* जिल्ह्यात सर्वाधिक 20 मृत्यू 9 सप्टेंबर 2020 रोजी झाले आहेत.
* जिल्ह्यात सर्वाधिक 1223 बाधित रूग्ण 24 मार्च 2021 रोजी आढळून आले आहे.
* जिल्ह्यात सर्वाधिक 995 रूग्ण 25 मार्च 2021 रोजी कोरोनामुक्त झाले आहेत.
* जिल्ह्यात आतापर्यंत 5 लाख 97 हजार 638 संशयित व्यक्तीची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.
* जिल्ह्यात आतापर्यंत 83165 व्यक्ती कोरोना बाधित झाल्या आहेत.
* जिल्ह्यात आतापर्यंत 70877 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहेत.
* जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत 1554 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
*जिल्ह्यात आज रोजी 10734 कोरोना बाधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
* जळगाव जिल्ह्यात 1 लाख 5 हजार 117 नागरीकांना करोना प्रतिबंध लसीचा पहिला डोस तर 14780 नागरीकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
संकलन – जिल्हा माहिती अधिकारी
संदर्भ – जिल्हा शल्य चिकित्सक