जळगाव लाईव्ह न्यूज । २२ डिसेंबर २०२१ । पारोळा शहराची वाढती लोकसंख्या पाहता सध्या असलेली पिण्याच्या पाण्याची साठवणूक सुविधा, जलकुंभ व जलशुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता वाढविण्यासाठी, शासनाने निधी द्यावा, अशी मागणी २६ ऑक्टोबरला माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. त्यासंदर्भात शिवसेना जिल्हा प्रमुख डॉ.हर्षल माने यांनी पाठपुरावा केला. त्यामुळे या कामांसाठी एक कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे यासंदर्भात मागणी करण्यात आली होती. त्यांनी तात्काळ या याेजनेला मंजुरी देऊन नगरविकास विभागामार्फत वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून १ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या बाबत शासनाने ३ नाेव्हेंबरला आदेश पारित केले आहेत. नवीन जलकुंभ उभारणी व जल शुद्धीकरणाची क्षमता वाढल्यानंतर शहराला किमान एक दिवसाआड पाणीपुरवठा करणे शक्य होईल.
या कामात पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चिमणराव पाटील यांचे सहकार्य लाभल्याचे अशी माहिती डॉ. माने व माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.
हे देखील वाचा :
- १०व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे १५ ते १९ जानेवारी २०२५ दरम्यान आयोजन
- नव्या वर्षात कोणता सण कोणत्या तारखेला? वाचा सणांच्या तारखांची संपूर्ण यादी
- यंदाचा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे यांना जाहीर
- आज धनत्रयोदशी! जाणून घ्या पूजाविधी आणि शुभ मुहुर्त..
- उत्तर महाराष्ट्रातून लोकमत खान्देश पॉलिटिकल आयकॉन पुरस्काराने अमोल शिंदे सन्मानित