⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

लिंकींग शेअर्सचे १ कोटी ८० लाख ‘ग. स. ‘ला परत देण्याचे जिल्हा बँकेला न्यायालयाचे आदेश

जळगाव लाईव्ह न्यूज । २ मार्च २०२३ । लिंकींग शेअर्सचे १ कोटी ८० लाख ‘ग. स. ‘ला परत देण्याचे आदेश जिल्हा बँकेला न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाच्या या महत्वपुर्ण निर्णयामुळे ग. स. संस्थेच्या सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असुन जे.डी.सी.सी. बँकेला मोठा धक्का बसला आहे.

अधिक माहिती अशी कि, ग. स. संस्थेचे जे. डी. सी. सी. बँकेकडे सन १९१६ ते सन १९९९ या कालावधीत वेळोवेळी घेतलेल्या कर्जापोटी १ कोटी ८० लाख रुपयाचे शेअर्स जमा होते. रक्कमेवर जे. डी. सी. सी. बँक कोणत्याही प्रकारचा लाभांश देत नसल्याने सदरील रक्कम व्याजासह परत मिळणे यासाठी संस्थेतर्फे तत्कालीन अध्यक्ष उदय मधुकर पाटील यांचे कालावधीत सन २००६ मध्ये मे सहकार न्यायालय, जळगांव येथे दावा क्र. जे /५४०/२००६ दाखल केलेला होता. याबाबत निर्णय झाला असून

उभयपक्षाचे पुराव्याअंती मे सहकार न्यायालयाने दिनांक २५/०७/२०२२ रोजी ग. स. संस्थेच्या वाजुने निर्णय पारित करून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे नियम २३ नुसार शेअर्सचे मुल्यांकन करून रक्कम रू.१ कोटी ८० लाख मात्र निकालाच्या तारखेपासुन ६० दिवसांचे आत ग. स. संस्थेस अदा करावी असे न केल्यास दावा दाखल तारखेपासुन द.सा.द.शे. ६ % दराने व्याजाची रक्कम दयावी असा हुकुम जे. डी. सी. सी. बँकेला दिलेला होता.

सदरील निकालाच्या विरोधात जे. डी. सी. सी. बँकेने मे. महाराष्ट्र राज्य सहकारी अपिलीय न्यायालय, मुंबई वेंच, औरंगावाद येथे अपिल नं. ५४ / २०२२ व संस्थेचे अपिल नं. ६०/२०२२ दाखल केलेले होते. सदरील अपिलात जळगांव येथील मे. सहकार न्यायालयाने विवाद क्रमांक ५४०/२००६ मध्ये दिलेला निकाल आणि निवाडयात सुधारीत करून जे. डी. सी. सी. बँकेने ग. स. सोसायटीने सभासदत्वाचा राजिनामा दिल्याच्या दिनांक ०१/११/२००३ पासुन द.सा.द.शे.०८% व्याज दराने लिंकींग शेअरची रक्कम परत करणेचे आदेश दिनांक १६/०२/२०२३ रोजी दिलेले आहेत.

शेअर्स लिंकींग रक्कम रूपये १ कोटी ८० लाख या रक्कमेवर दिनांक ०१/११/२००३ पासुन द.सा.द.शे.०८% दराने व्याजासहीत एकुण रक्कम रूपये ४ कोटी ५७ लाख होत आहेत. मे महाराष्ट्र राज्य सहकारी अपिलीय न्यायालय, मुंबई बेंच, औरंगावाद न्यायालयाचे महत्वपुर्ण निर्णयामुळे ग. स. संस्थेच्या सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असुन जे.डी.सी.सी. बँकेला मोठा धक्का बसला आहे. संस्थेतर्फे सदरील दाव्याचे कामकाज विधीतज्ञ अॅड. एम. वी. मोयखेडे, जळगांव यांनी पाहिले.