हिंदू-मुस्लिम बांधवांचे सण सुरु असल्याने लोडशेडिंग तात्काळ रद्द करावी – काँग्रेस
जळगाव लाईव्ह न्यूज । ५ एप्रिल २०२२। जिल्हा युवक काँग्रेस व जिल्हा कांग्रेस च्या वतीने जळगाव जिल्हा काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार व युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेतली .
संपूर्ण एप्रिल महिना हा सर्व जाती धर्मच्या सण उसत्वाचा महिना आहे या महिन्यात हिंदू धर्माची राम नवमी, मुस्लिम धर्माचा रमजान ख्रिश्चन ,धर्मच गुड फ्रायडे असे सण आले आहे व जळगाव जिल्ह्याचे तापमान देखील वाढत आहे
परंतू महावितरणने आता भारनियमन करणार असे सांगितले आहे त्या अनुषंगाने वरील सर्व कारणास्तव जिल्ह्यात भारनियमन करू नये व रद्द करावे असे जिह्वाधिकारी अभिजित राऊत यांनी निवेदनाद्वारे सांगण्यात आले
याप्रसंगी जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, महानगरध्यक्ष मुजीब पटेल, मा युवक प्रदेश सरचिटणीस मुक्तदिर देशमुख, मकसूद पटेल, फैजान शहा , रमजान खान आदी पदाधिकारी उपस्थित होते