हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जळगावात आंदोलन !
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ सप्टेंबर २०२२ । गोशामहल विधानसभा मतदारसंघातील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांना 23 ऑगस्ट 2022 या दिवशी अटक करण्यात आली. त्यांच्यावर एका पंथीयांच्या श्रद्धास्थानांचा कथित अवमान केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी न्यायालयाने त्यांना जामीनही दिला आहे. त्यानंतर अन्य एका जुन्या प्रकरणात आमदार टी. राजासिंह यांना पुन्हा 25 ऑगस्ट 2022 या दिवशी अटक करण्यात आली. एकूणच या प्रकरणात आमदार टी. राजासिंह यांना जाणीवपूर्वक लक्ष करून त्रास दिला जात आहे. आता तर त्यांच्यावर ‘पी.डी. ॲक्ट’अंतर्गत गुन्हा नोंद करून त्यांना किमान एक वर्ष जेलमध्ये अडकवून ठेवण्याचा भयंकर कट रचण्यात आला आहे. त्यांना अटक करण्यापूर्वी आणि अटक केल्यानंतर जिहादी प्रवृत्तीच्या धर्मांधांकडून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. तसेच ‘सर तन से जुदा’सारख्या प्रक्षोभक आणि जीवे मारण्याच्या घोषणा देत हिंसक आंदोलने केली जात आहेत. अशा प्रकारे धमक्या देणार्या धर्मांधांना आणि त्यांना पाठीशी घालणार्यांना त्वरित अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी, आमदार टी राजा सिंह याना सशस्त्र सुरक्षा प्रदान करण्यात यावी आणि त्यांच्यावरील सर्व खटले महाराष्ट्र किंवा कर्नाटक किंवा गोवा या बाजूच्या राज्यांत हस्तांरित करावेत अशा मागण्या हिंदु जनजागृती समितीचे प्रशांत जुवेकर यांनी केल्या आहे. ते गुरुवारी ८ सप्टेंबर या दिवशी आयोजित केलेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात बोलत होते.
या आंदोलनात जळगाव मधील सर्व हिंदुत्ववादी संघटना आणि धर्मप्रेमी बांधव सहभागी झाले होते. या वेळी समाजसेवक आनंद मराठे, भुसावळ येथील भूषण महाजन आणि हिंदू राष्ट्र सेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख मोहन तिवारी यांनीही मनोगत व्यक्त केले.
झारखंड येथील अंकिताचा मारेकरी शाहरुखला फाशीची शिक्षा द्यावी !
काही दिवसांपूर्वी झारखंडमधील दुमका येथे शाहरुख नावाच्या एका धर्मांध तरुणाने बारावीत शिकणार्या अंकिता या विद्यार्थिनीला पेट्रोल शिंपडून जिवंत जाळले. ती 45 टक्के भाजली होती. 28 ऑगस्ट 2022 रोजी त्या मुलीचा दुःखद मृत्यू झाला. शाहरुखला बंदीस्त केल्यानंतरही पश्चाताप तर दूरच, तो मनमोकळेपणाने हसताना दिसला. हे अत्यंत निंदनीय आहे. त्यामुळे शाहरुखला फाशीची शिक्षा द्यावी. अंकिता हत्या प्रकरण केवळ मारेकर्यांपुरते मर्यादित न ठेवता, अशा घटनांमागील मुख्य सूत्रधारांना आणि त्यांच्या समाजाला तसेच जीवघेण्या कृत्यांचे सखोल अन्वेषण करून दोषींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. या प्रकारासाठी केंद्र सरकारने लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा करावा.
धानोरा, चोपडा येथे गणेशभक्तांवर लाठीमार करणार्या पोलीस अधिकार्यांना निलंबित करावे !
गणेश विसर्जनाच्या वेळी विनाकारण गणेश मंडळातील सदस्यांवर आणि निष्पाप गणेश भक्तांवर लाठीमार करून त्यांना अमानुष मारहाण करणार्या सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण दांडगे यांना त्वरित निलंबित करावे आणि गणेश भक्तांना न्याय मिळवून द्यावा. अशा मागण्याही या वेळी करण्यात आल्या. या सर्व मागण्यांचे निवेदन जळगाव जिल्हाधिकारी श्री. अभिजित राऊत याना देण्यात आले.