⁠ 
रविवार, डिसेंबर 15, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | सलग दुसऱ्या वर्षी होळीच्या उत्सवावर पडले विरजण

सलग दुसऱ्या वर्षी होळीच्या उत्सवावर पडले विरजण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मार्च २०२१ । यंदा सलग दुसऱ्या वर्षी होळीच्या उत्सवावर विरजण पडले. वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी तीन दिवसांचा लॉकडाउन जारी केला. रविवारी पहाटेपासून मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत हा लॉकडाउन लागू राहील. ऐन होळीच्या उत्सवात लॉकडाउन जारी करणे गर्दी टाळण्यासाठी स्वाभाविक होते.

होळी, धूलिवंदनसाठी गर्दी होऊ नये म्हणून हे प्रतिबंधात्मक उपाय करण्यात आले. त्या मुळे रविवारी होळी अगदीच मर्यादित स्वरूपात साजरी झाली. मात्र, धूलिवंदनाला रंगांमध्ये भिजणारे जळगाव शहर, जिल्ह्यातील ग्रामीण भाग आणि विशेषतः आदिवासी पट्ट्यात रंगांचा बेरंग झाल्याचे दिसून आले. रंगांच्या छटांनी माखलेल्या चेहऱ्यांवरील आनंदाचे डोह तरंगतानाचे चित्र यंदा नव्हते. हे चौक ओस पडलेय.

गेल्या वर्षी धूलिवंदनच्या दरम्यान कोरोनाचे रुग्ण नव्हते; पण दहशत होती. लॉकडाउन नव्हते; पण होळीचा हवा तसा उत्साह नव्हता. यंदा देशभरात अन्यत्र होळीच्या रंगांची उधळण होत असताना महाराष्ट्र व विशेषतः जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग तीव्रतेने वाढत आहे.

यंदा सलग दुसऱ्या वर्षी होळीच्या उत्सवावर विरजण पडले. जळगाव शहरात दर वर्षी नेहरू चौक, काव्यरत्नावली चौक, जुने जळगाव, नागरी वस्त्यांमधील भागात धूलिवंदनाचा उत्साह शिगेला पोचलेला असतो. सोमवारचे चित्र मात्र सुन्न करणारे होते. रस्त्यांवरील शुकशुकाट, घरात बसलेली तरुणाई आणि स्वच्छंद बागडणाऱ्या मुलांचे घरातच हिरमुसलेले चेहरे… असे विदारक चित्र अनुभवाला मिळाले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.