⁠ 
शुक्रवार, जानेवारी 10, 2025
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | सर्पदंश झालेल्या महिलेच्या मृत्यू प्रकरणी कारवाईची मागणी

सर्पदंश झालेल्या महिलेच्या मृत्यू प्रकरणी कारवाईची मागणी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२२ । तालुक्यातील नगरदेवळा प्राथमिक आरोग्य केंद्रात कोणत्याही प्रकारचे प्राथमिक उपचार न करता 108 क्रमांकाच्या शासकीय रुग्णवाहिकेने रुग्णाला पुढील उपचारासाठी रवाना केले जाते. मात्र, तत्पूर्वी कोणतेही प्रथमोपचार येथे केले जात नसल्याची तक्रार आहे. अशातच प्रथमोपचाराअभावी सर्पदंश झालेल्या महिलेचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.
पाचोरा तालुक्यातील बदरखे येथील छोटीबाई सुरेश चित्ते यांना 5 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास सर्पदंश झाला होता. त्यांना तात्काळ गावातील लोकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, तेथे कोणतेही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते. तसेच उपस्थित आरोग्य सेविकेने कोणत्याही प्रकारचे प्रथमोपचार न करता सरळ भडगाव रुग्णालयात
दाखल करण्यासाठी शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. रुग्णाला भडगाव ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून तेथील डॉक्टरांनी जळगाव जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. तेव्हा छोटीबाई यांचा मृत्यू झाला. उपचाराच्या विलंबामुळे एका निरपराध महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. या प्रकारास सर्वस्वी नगरदेवळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी, कर्मचारी दोषी असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह