बातम्या

सकारात्मक पाऊल : जि.प.च्या ६५ शाळा करणार रेनवॉटर हार्वेस्टिंग

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२२ । भुसावळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांनी रेनवॉटर हार्वेस्टिंग करायला पुढाकार घेतला आहे. तालुक्यातील १८ शाळांमध्ये रेनवाॅटर हार्वेस्टिंगची कामे करण्यात आली आहेत. यामुळे शाळेच्या छतावर पडणारे पाणी थेट जमीनीत मुरवले जाईल. इतर ४७ शाळांमध्ये ही कामे सुरू आहेत.


भूगर्भातील पाणी पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. त्यामुळे पावसाचे जास्तीत जास्त पाणी जमिनीत जिरवणे गरजेचे आहे. त्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात. त्याचाच एक भाग म्हणून शाळा स्तरावर रेन वॉटर हार्वेस्टिंगचा उपक्रम राबवला जातो. आतापर्यंत १८ शाळांमध्ये कामे पूर्ण झाली. अाचेगाव, तळवेल, पिप्रींसेकम, साकरी, चाेरवड, खडके, कुऱ्हापानाचे, मांडवेदिगर, वराडसीम, बेलव्हाय, जाेगलखेडा, सुनसगाव, काहूरखेडा, टहाकळी, गाेजाेरे, कंडारी अशी ही गावे आहेत.

Related Articles

Back to top button