⁠ 
रविवार, डिसेंबर 22, 2024
Home | बातम्या | संथगतीने सुरू असलेल्या शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम पूर्ण करा

संथगतीने सुरू असलेल्या शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम पूर्ण करा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२२ । शिवाजीनगर रेल्वे उड्डाण पुलाचे काम गेल्या सव्वा तीन वर्षापासून सुरु आहे. १८ महिन्याची मुदत असतांना मक्तेदारांकडून होणाऱ्या दिरंगाईमुळे शिवाजीनगर वासियांना मोठ्याप्रमाणात त्रास सहन करावा लागल आहे. अक्षरक्ष: जीव धोक्यात घालून शिवाजीनगर वासियांना रेल्वे रुळावरुन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे या पुलाचे काम तातडीने पुर्ण करुन मक्तेदारावर कारवाई करण्यात यावी, अश्या मागणीसाठी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस महानगर, धर्मरथ फाउंडेशन, रौद्र शंभो फाउंडेशन यांच्यासह विविध संघटना व शिवाजीनगर वासियांनी आंदोलन केले.


यावेळी अशोक लाडवंजारी, राजु मोरे, सुनिल माळी, रिंकु चौधरी, अमोल कोल्हे, अकील पटेल, सुशिल शिंदे, भगवान सोनवणे, विनायक पाटील, दिलीप माहेश्वरी, रहिम तडवी, किरण राजपूत, जयश्री पाटील, किरण चव्हाण, विनोद देशमुख, अर्चना कदम, जुनेश खाटीक, नवनाथ दारकुंडे, मनोज पाटील यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते व शिवाजी नगरातील नागरिकांची उपस्थिती होती.


दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांतकुमार येळाईत व सहाय्यक अभियंता सुभाष राऊत यांनी आंदोलनास भेट देऊन आंदोलकांशी चर्चा करत लवकरात लवकर मक्तेदारकडून पुलाचे काम पूर्ण करून घेण्यात येईल व दोन महिन्यांत वाहतूक सुरू केली जाईल, असे आश्वासन दिले.


  • अमृत योजना व सर्व्हिस रस्त्याच्या कामाविषयी सुमारे एक वर्षांपासून पत्र देऊन व पाठपुरावा करूनही महानगरपालिकेककडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे पुुलाच्या कामास विलंब होत आहे,असे सां.बा.विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी महानगरपालिकेचे शहर अभियंता विलास सोनवणी हे देखील त्याठिकाणी आले व त्यांनीही पाणीपुरवठा अभियंता गोपाल लुले यांना सूचना दिल्या असून लवकरच कामातील अडथळे दूर करू असे आश्वासन आंदोलकांना दिले. त्यावर सार्वजनिक बांधकाम विभाग व मनपाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त बैठक घेऊन प्रश्न सोडविण्याची मागणी आंदोलकांनी केली.यावी अशी मागणी आंदोलकांनी केली
author avatar
टीम जळगाव लाईव्ह