जळगाव शहरबातम्या

संतज्ञानेश्वर विद्यालयात टाळ मृदंगाच्या गजरात विद्यार्थ्यांनी काढली दिंडी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जुलै २०२२ । शहातील मेहरुण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयामध्ये आषाढी एकादशीनिमित्त विशेष दिंडीच आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी टाळ मृदुंगाच्या तालावर ठेका धरत वातावरण भक्तीमय केले होते.

श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयमध्ये सकाळी विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या वेशभूषेत तसेच मुलींनी पारंपारिक विषयांमध्ये वस्त्र परिधान करून विद्यालयात उपस्थिती दिली होती. यावेळी विद्यार्थ्यांनी कुर्ता पायजमा तर मुलींनी नऊवारी साडी व पातळ घातलं होतं.

मुलांनी वारकऱ्यांच्या वेशभूषांमध्ये दिंडीत सहभाग घेतल्याने चैतन्यमय वातावरण झालं होतं. दिंडीमध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या मनमोहक मूर्ती ठेवलेल्या होत्या. पालखी पूजन व मूर्तिपूजन संस्थेचे अध्यक्ष तथा मेहरुणचे नगरसेवक प्रशांत नाईक व संचालिका अर्चना नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी टाळा मृदुंगाच्या गजरात व लेझीम खेळून जल्लोष केला. यावेळी विद्यार्थ्यांनी फुगडी देखील खेळले. इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी “माऊली माऊली” या गाण्यावरती नृत्य सादर केले. पालकांचा देखील या वेळेला सहभाग होता.

दिंडी उपक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका शितल कोळी, उपशिक्षक तथा संस्थेचे सचिव मुकेश नाईक, उज्वला नन्नवरे, साधना शिरसाट, आम्रपाली शिरसाट, रूपाली आव्हाड, नयना अडकमोल, सोनाली चौधरी, स्वाती नाईक,प्रियंका जोगी, साक्षी जोगी, दिव्या पाटील, सोनाली जाधव, कोमल पाटील, पुनम निकम, मेघा सोनवणे, जयश्री खैरनार, शिल्पा कोंगे, योगिता सोनवणे, दिनेश पाटील आदींनी यशस्वीपणे केले.

Related Articles

Back to top button