---Advertisement---
जळगाव जिल्हा महाराष्ट्र राजकारण

संजय राऊत अन् खडसेंची सत्र न्यायालयात भेट, भेटीनंतर खडसे म्हणाले..

sanjay raut eknath khadse
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्युज । १८ ऑक्टोबर २०२२ । मुंबई येथे सत्र न्यायालयाच्या लिफ्टजवळ संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची भेट झाली. यावेळी खडसेंनी राऊतांची चौकशी केली. उत्तर देताना राऊत म्हणाले कि, ‘चिंता करु नका, सगळं ओके आहे’.

शिवसेना खासदार संजय राऊत यांना अजूनही हायकोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही. संजय राऊत यांच्या जामिनावरील सुनावणी २१ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. पर्यायी राऊत यांचा तुरुंगातील मुक्काम तूर्तास वाढला आहे. मात्र सत्र न्यायालयात लिफ्टजवळ संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची भेट झाली. यावेळी खडसेंनी राऊतांची चौकशी केली. उत्तर देताना राऊत म्हणाले कि, ‘चिंता करु नका, सगळं ओके आहे’. यावेळी मंदाकिनी खडसे यादेखील त्यांच्या सोबत होत्या.

यावेळी खडसे म्हणाले कि, “संजय राऊत म्हणाले ओके है सब, काही चिंता करू नका म्हणे, आताच बाहेर येणार म्हणे मी” खोक्यासंदर्भात काही बोलले का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, “खोके नाही, ओके आहे बोलले” अशी मिश्किल टिपण्णी खडसेंनी केली.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---