जळगाव जिल्हा

शेतकऱ्याची फसवणूक : खात्यातून लाख रूपये लंपास

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ एप्रिल २०२२ । मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी येथील शेतकऱ्याला क्रेडीट कार्ड ॲक्टीव्ह करण्याच्या बहाण्याने ९९ हजार ८६२ फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी कि, मुक्ताईनगर तालूक्यातील बेलसवाडी येथे संजीव श्रीराम पाटील हे आपल्या कुटूंबीयांसह वास्तव्यास आहेत. ते शेतकरी असून ३ ते ५ जानेवारी दरम्यान संजीव पाटील यांच्या घरी पोस्टाने सेंट्रल बँक व स्टेट बँकेचे असे संयुक्त क्रेडीट कार्ड आले. कुठल्याही बँकेत अर्ज केला नसतांनाही पोस्टाने क्रेडीट कार्ड आल्याचा संजीव पाटील यांना आश्चर्याचा धक्का बसला. याच काळात त्यांना त्यांच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तींनी फोन करुन बँकेतून बोलत असल्याचे भासविले. तसेच पोस्टाने घरी आलेले क्रेडीट कार्ड ॲक्टीव्ह करण्याच्या बहाण्याने संजीव पाटील यांची ९९ हजार ८६२ रुपयांत ऑनलाईन फसवणूक केली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button