वर्षभरात जळगाव शहर कोरोनामुक्त करणार : उपायुक्त संतोष वाहुळे यांचा संकल्प
जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जुलै २०२१ । जळगाव शहरात कोरोनाचे रुग्ण नगण्य असले तरी पुढे तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. जळगाव शहराला पुढील एका वर्षात संपूर्णतः कोरोनामुक्त करण्याचा संकल्प मनपा उपायुक्त संतोष वाहूळे यांनी केला आहे.दि.१५ जुलै रोजी वाढदिवसानिमित्त हा संकल्प केला असल्याची प्रतिक्रिया उपायुक्त संतोष वाहुळे यांनी दिली.
महापालिकेचे दबंग अधिकारी तथा उपायुक्त संतोष वाहुळे यांचा महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभागातर्फे वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी जळगाव लाईव्हशी बोलताना वाहुळे म्हणाले की, येत्या वर्षभरात जळगाव शहराला कोरोनामुक्त करण्याचा मी संकल्प केला आहे. वाहुळे यांचा सत्कार करतांना अतिक्रमण विभागातील कर्मचारी म्हणाले की, अशी अधिकारी आमच्या विभागात पुन्हा येतील असे वाटत नाही. साहेबांमुळे आम्हाला एक वेगळी प्रेरणा मिळाली आणि खूप काही शिकायला मिळाल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.