जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२२ । रेल्वे सेवानिवृत्तांच्या तक्रारी कमी करण्यासाठी १५ जून रोजी सकाळी ११ वाजता पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. ही पेन्शन अदालत भुसवाळ येथील मंडल रेल प्रबंधक कार्यालयात आयोजित केली आहे. पेन्शनधारकांच्या तक्रारींचे शासनाच्या वर्तमान दिशा निर्देशानुसार निराकरण केले जाईल. या अदालतीत केवळ पेन्शनशी संबंधित प्रकरणे घेतली जातील. भुसावळ विभागातून जे कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहेत व पेन्शन, सेटलमेंट देयकाबाबत तक्रारी आहेत ते कर्मचारी आपल्या तक्रारींचे अर्ज (तीन प्रतीत) वरिष्ठ मंडल कार्मिक अधिकाऱ्यांकडे पाठवू शकतात. अर्जात आपली सर्व माहिती नमूद करून अर्जासोबत पेन्शन पेमेंट ऑर्डर (पीपीओ), बँकेच्या पेन्शन स्लिप व पास बुकची झेरॉक्स जोडून ती कागदपत्रे भुसावळच्या मुख्य प्रवेशद्वारावरील ड्रॉपमध्ये बॉक्स टाकावीत. ३० एप्रिल ही कागदपत्रे सादर करण्याची शेवटची मुदत आहे. |