जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२२ । राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याच्या निषेध म्हणून. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज जळगाव शहरातील महात्मा गांधी उद्यानातील पुतळ्याला माल्यार्पण करून हल्लेखोरांना सद्बुद्धी यावी अशी प्रार्थना करत शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले आहे.
न्यायालयाचा निर्णय आल्यावरही एसटी कर्मचाऱ्यांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला असताना शरद पवार यांच्या घरावर दगडफेक करण्याचे कारण काय? आजपर्यंत नेत्यांच्या घरावर अशा प्रकारे कृत्य पुरोगामी महाराष्ट्रात कधीच घडलेले नाही. महाराष्ट्राचे लोकनेते असलेले शरद पवार यांच्या घरावर अशा प्रकारचा दगडफेक होणे हे अत्यंत निंदनीय कृत्य असल्याचे यावेळी सांगण्यात आले. याप्रसंगी प्रदेश चिटणीस एजाज मलिक, राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, ललित बागुल, युवक काँग्रेसचे महानगराध्यक्ष रिकु चौधरी, सुशील शिंदे, अॅड. सचिन पाटील, अमोल कोल्हे, राजू मोरे, किरण राजपूत संजय जाधव रहीम तडवी, रिजवान खाटीक, राहुल टोके, प्रसाद वानखेडे, अकील पटेल, जावेद भाई मोहसीन भाई आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.