⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | रावेर | रावेर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची एकनाथराव खडसेंनी केली पाहणी

रावेर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची एकनाथराव खडसेंनी केली पाहणी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मे २०२१ । ऐनपुर परीसरात काल गुरुवारी रात्री झालेल्या वादळी जोरदार पावसामुळे केली पिकाचे अतोनात नुकसान झाले. दरम्यान, आज शुक्रवारी राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी विटवा , निंबोल, ऐनपूर, सुलवाडी, कोळदा, धामोडी. रेंभोटा-वाघाडी शिवार येथे जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.

यावेळी खडसे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत केळी पिकाचे झालेले नुकसान बघता पीक विम्याच्या अटी शिथिल करण्यात याव्यात तसेच त्वरित पंचनामे करून मदत द्यावी,तसेच “पी एम एफ बी वाय”गव्हर्नमेंट वेबसाईटवरून सीएससी सेंटरमध्ये जाऊन आपल्या बागेचा नुकसानग्रस्त फोटो सादर करून नुकसानीचा अर्ज करता येतो अशी माहिती दिली.

याप्रसंगी माजी आमदार अरुणदादा पाटील, माजी जि.प. सदस्य रमेश नगराज पाटील, योगेश कोलते सर ,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी, पं. स. सदस्य दीपक पाटील, कृ.ऊ.बा चे माजी उपसभापती दुर्गादास पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे ता.सरचिटणीस वाय डी पाटील, रायुकाँचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, निंभोरा सरपंच सचिन महाले, खिर्डी सरपंच गफूर कोळी,  रावेर शहराध्यक्ष मेहमूद शेख, माजी जि प सदस्य आत्माराम कोळी, राविकॉ तालुकाध्यक्ष साईराज वानखेडे रायुकाँ कार्याध्यक्ष ललित पाटील, शुभम मुर्हेकर, लखन पाटील आदी उपस्थित होते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.