⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | राज्याचे 40 मुख्यमंत्री त्यामुळे कोणीच कोणाचं ऐकत नाही – अजित पवार

राज्याचे 40 मुख्यमंत्री त्यामुळे कोणीच कोणाचं ऐकत नाही – अजित पवार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ सप्टेंबर २०२२ । राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. जळगाव जिल्हा दौऱ्यावर असताना अजित पवार यांनी पाचोऱ्यामध्ये (AJIT PAWAR IN PACHORA) जोरदार भाषण केलं. या भाषणामध्ये शिंदे सरकारवर अजित पवार यांनी चांगलीच टीका केली.

यावेळी अजित पवार म्हणाले की, शेतकरी वाचला तर महाराष्ट्र वाचेल शेतकऱ्यांना सध्या मदतीची गरज आहे मात्र हे सरकार शेतकऱ्यांना मदत देत नाहीये. फक्त हे सर्व सामान्य नागरिकांचे सरकार आहे इतकेच बोलत आहे. अशावेळी जे सरकार शेतकऱ्यांचे भलं करू शकत नाही ते सर्वसामान्य नागरिकांच सरकार कसं?

पुढे बोलताना अजित पवार असे म्हणाले की, महाविकास आघाडीच्या सरकारवर आमच्या पक्षश्रेष्ठींचा वचक होता. काँग्रेस कडून काही चुकलं तर लगेच सोनिया गांधी त्यांना समज देत होत्या. राष्ट्रवादीकडून शरद पवार साहेब तर शिवसेनेकडून उद्धव ठाकरे आपापल्या नेत्यांना आमदारांना समज देत होते. मात्र येथे 40 ते 40 आमदार स्वतःला मुख्यमंत्री समजत असल्यामुळे कोणावरही कोणाचाच वचक उरलेला नाही.

याचबरोबर यांच्या पक्षातला कोणीही खासदार येतो आणि पोलिसावर बोट ठेवतो. हे काय बरं नाही. त्याचबरोबर कोणताही आमदार येऊन अधिकारात तुझी बदली करून टाकेल अशी धमकी देतो. अधिकारी काय तुम्हाला तुमचे घरगडी वाटले का? अशी टीका देखील अजित पवार यांनी केली.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह