जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२१ । एरंडोल येथे पवित्र रमजान महिन्यात निमित्त पोलीस स्टेशन सभागृहात पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील मुस्लिम बांधवांची बैठक संपन्न झाली.
पवित्र रमजान महिन्यात सर्व मुस्लिम बांधवांनी कोठेही गर्दी न करता शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करून पवित्र रमजान महिना शांततेत व आनंद साजरा करावा व प्रशासनास सहकार्य करावे असे आव्हान पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी केले. याप्रसंगी जावेद मुजावर अँड अहमद सय्यद यांनी आपले विचार व्यक्त केले.
सूत्रसंचालन सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे यांनी केले. तर पोलीस कॉन्स्टेबल संदीप सातपुते यांनी आभार मानले याप्रसंगी नगरसेवक जहिरोद्दीन शेख कासम, असलम पिंजारी, शेख सलीम , हाफिज शकील, हाफिज नाझिम, मुफ्ती ,हाफीज खलील हाफिज जुबेर शफिक शेख, मुसा शेख, हाजी शफी, शकील पिंजारी, युसुफ शेख, आदी उपस्थित होते यावेळेस सोशल डिस्टन्स या नियमानुसार सदरची मीटिंग पार पडली बैठकीच्या यशस्वितेसाठी पोलीस कॉन्स्टेबल मिलिंद कुमावत अमित तडवी पंकज पाटील सुनील लोहार आदींनी परिश्रम घेतले.