जळगाव लाईव्ह न्युज | २२ जुलै २०९१ |
भारतीय जनता पार्टी प्रदेश सरचिटणीस तथा राज्याचे माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचा दौरा केला. युवा वारीयर्स शाखांचे उद्घाटन केले या वेळी जळगाव कडून येताना त्यांनी सामनेर व नांद्रा या ग्रामीण भागातील शाखांचे उद्घाटन केले. नंतर पाचोरा शहरात कृष्णापुरी, हनुमान नगर,भास्कर नगर स्टॉप या शाखांचे उद्घाटन करून पाचोरा येथील अटल भारतीय जनता पार्टी कार्यालय ला भेट देऊन सत्कार स्वीकारला व भडगाव तालुक्यात प्रस्थान करत मा.मंत्री बावनकुळे यांनी भडगाव शहरातील पारोळा चौफुली चौक येथील शाखा उदघाटन करून कजगाव येशील कार्यकर्त्यांचा सत्कार स्वीकारून तांदुळवाडी येथील शाखेचे उदघाटन करून ते पुढे चाळीसगाव कडे मार्गस्थ झाले.
यावेळी पाचोरा तालुक्यातील तेली समाजाच्यावतीने देखील समाज बांधवांनी त्यांचा सत्कार करत पाचोरा शहरात त्याचे स्वागत केले.भाजपा कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत पाचोरा-भडगाव मतदार संघाची धुरा पक्षाने अमोल शिंदे यांच्याकडे सोपवून मतदारसंघाला युवा संजीवनी दिलेली आहे.त्यामुळे मोठ्या प्रमाणात युवावर्ग याठिकाणी जोडला गेलेला आहे.परंतु येणाऱ्या काळात अजुन मोठ्या जोमाने व ताकतीने संघटन वाढवावे असे बावनकुळे यांनी बोलताना सांगितले व भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांची पाठ थोपटत त्यांनी वाढवलेल्या संघटनेचे व मेहनतीचे कौतुक केले. तसेच भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी पाचोरा तालुक्याच्या युवा मोर्चा ने गेल्या दीड वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा घेऊन सर्व युवामोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना भविष्यात अजून चांगले व सामाजिक कामे करण्याचा शुभेच्छा दिल्या व कौतुक देखील केले.तसेच यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी बोलताना सांगितले की पाचोरा भडगाव शहरासह ग्रामीण भागातील तरुण वर्ग हा मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टी सोबत जोडला गेला असून येणारा काळ हा युवा पर्वाचाच असेल असे ते बोलताना म्हणाले.
याप्रसंगी भाजपा जिल्हा सरचिटणीस मधुकर काटे जिल्हा चिटणीस सोमनाथ पाटील,भडगाव तालुकाध्यक्ष अमोल नाना पाटील, शहाराध्यक्ष रमेश वाणी,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सतीश शिंदे,पंचायत समिती सभापती वसंत गायकवाड, विधानसभा क्षेत्र प्रमुख हिम्मतसिंग निकुंभ,भाजयुमो तालुकाध्यक्ष मुकेश पाटील, शहराध्यक्ष समाधान मुळे, पं.स.सदस्य सुभाष पाटील, बन्सीलाल पाटील,गोविंद शेलार, संजय पाटील अनिल पाटील बन्सी परदेशी वसंत पाटील रतिलाल पाटील विनोद नेरकर प्रमोद पाटील शेखर बच्छाव दिपक माने,प्रशांत सोनवणे,सरचिटणीस योगेश ठाकूर,कुमार खेडकर,विजय पाटील, राहुल गायकवाड, लकी पाटील हेमंत चव्हाण, किरण पाटील, योगेश चौधरी,नितेश पाटील,ललित महाजन, जगदिश पाटील,विरेंद्र चौधरी,भैय्या चौधरी, गजानन पाटील,रहीम बागवान ,रामा जठार, अमोल नाथ शुभम पाटील किरण शिंपी प्रदीप सोमवंशी नकुल पाटील नितीन महाजन जिभाऊ चौधरी शांतीलाल पाटील ज्ञानेश्वर भोसले तसेच पाचोरा व भडगाव तालुक्यातील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.