जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑगस्ट २०२२ । भारतीय स्वातंत्र्याचा ७५ व्या अमृतमहोत्सवा निमित्त युनिटी ऑफ नेशन फाउंडेशनच्यावतीने अयोध्या नगर येथे अध्यक्ष लतेश चौधरी व सचिव चैतन्य ( गुड्डू ) कोल्हे यांच्या नेतृत्वात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर कार्यक्रमास उपस्थित सैनिकांच्या व मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला . भारतीय स्वातंत्र्याचे हे ७५ वे अमृतमहोत्सवी वर्ष असल्याने ७५ सैनिकांचा व पोलिसांचा मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपुरुषांच्या चरित्रपुस्तक व गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला . तसेच कार्यक्रमाअंतर्गत ७५ गोमातांचे लसीकरण , ७५ विद्यार्थ्यांना मुखपृष्ठावर राष्ट्रपुरुषांचे चित्र व माहिती असणाऱ्या वह्या वाटप व राष्ट्रपुरुषांच्या चरित्र पुस्तकाचे वाटप , ७५ गरजू महिलांना साडी वाटप , ७५ वृक्षारोपण , ७५ कामगारांची ई श्रम कार्ड नोंदणी , ७५ दीप प्रज्वलित करून भारत देशासाठी शाहिद झालेल्या सर्व शाहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली .
सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन व्यासपीठावर सैनिकांतर्फे खान्देश रक्षक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन पाटिल , महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संदिप सुरळकर उपस्थित होते तसेच नगरसेवक सुनीलदादा खडके , नगरसेवक डॉ. विरणभाऊ खडके , नगरसेविका सौ. रंजनाताई वानखेडे , महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंदभाऊ सपकाळे , छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे , सामाजिक कार्यकर्ते हर्षलभाऊ मावळे , युवा सामाजिक कार्यकर्ते पियुषभाऊ कोल्हे , माजी नगरसेवक प्रदीपभाऊ रोटे , युवासेनेचे शंतनु नारखेडे आदि उपस्थित होते . मनोगत व्यक्त करतांना संदिप सुरळकर यांनी सैन्यातील त्यांचे अनुभव कथन करत सैनिकांची व त्यांच्या कुटुंबीयांची मनस्थिती विषयी संवाद साधला यावेळी सर्व उपस्थित भावुक झाले , तर मुकुंद सपकाळे यांनी उपस्थितांना स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्ताने शुभेच्छा दिल्या तसेच हे राष्ट्र समता , बंधुता व सार्वभौम लोकशाहीच्या मार्गाने चालविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य असुन हिच शाहिदांना आपली श्रद्धांजली आहे असे सांगितले .
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युनिटी ऑफ नेशन फाउंडेशनचे कुणाल सोनार , कल्पेश पाटील , बबलू मराठे , विशाल चौधरी , धनंजय पाटील आदि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभारप्रदर्शन गिरणा पुनर्जीवन अभियानाचे प्रमुख विजय कोळी सर यांनी केले .