जळगाव लाईव्ह न्यूज । १ मार्च २०२२ । रशिया-युक्रेन युद्धाला आठवडा उलटला असून हजारो भारतीय विद्यार्थी अद्यापही युक्रेनला अडकून आहेत. जळगाव जिल्ह्यातील १९ विद्यार्थी युक्रेनला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली आहे. १९ पैकी ५ विद्यार्थी भारतात परतले असून ६ सीमेलगत आहेत तर ६ सुरक्षित आणि मार्गावर आहेत. दरम्यान, दोघांचा मोबाईल बंद असल्याचे समजते.

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार निकीत आमले, शोएब राशीद काकर, सुरज शिंदे, देवांग किशोर वाणी, बरीरा युसूफ पटेल हे विद्यार्थी भारतात परतले आहेत. यापैकी काही विद्यार्थी आपल्या स्वगृही देखील पोहचले आहेत.
सौरभ विजय पाटील, ओम मनोज कोल्हे, मुस्कान रामशंकर जैस्वाल, श्रद्धा आनंद धोनी, लोकेश विजय निंभोरे, क्षितिजा गजानन सोनवणे हे विद्यार्थी पोलंड सीमेलगत आणि हंगेरीजवळ आहेत. तसेच विजय दिलीप परदेशी, प्रसन्ना संजीव निकम, कल्याणी छगनराव पाटील, रोहन सुनील चव्हाण, यश राजेंद्र परदेशी, शिमा फतेमा शेख अन्सार हे विद्यार्थी सुरक्षित आहे. यश हा होस्टेलच्या भूमिगत बंकरमध्ये आहे.
जिल्ह्यातील निलेश योगराज पाटील, सुमित सुरेशचंद्र वैश्य या दोन विद्यार्थ्यांचे मोबाईल बंद आहेत. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना सुखरूप घरी आणण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.