---Advertisement---
यावल

यावल शहरात कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी नगरपरिषदने औषध फवारणी करावी, मनसेची मागणी

yawal news
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२१ । येथील यावल शहरातील नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रात मागील काही दिवसांपासुन सातत्याने कोरोना विषाणु संसर्गाच्या दुसऱ्या व अत्यंत घातक अशा महामारीची लक्षणीय वाढ होत असतांना नगर परिषदच्या माध्यमातुन कोणतीही नागरिकांच्या आरोग्या दृष्टीने खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत नसल्याने रोगाच्या प्रसार प्रचार रोखण्यात दिरंगाई व दुर्लक्ष करणाऱ्यांवर कायद्याशीर कार्यवाही करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे

yawal news

या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष जनहित चेतन अढळकर यांनी तहसीलदार यावल यांना आज दिनांक ७ एप्रील रोजी दिलेल्या तक्रार निवेदनात म्हटले आहे की , यावल शहरामध्ये मागील दोन महिन्यापासुन कोरोना विषाणु संसर्गाचा प्रादुर्भाव मोठया वेगाने वाढत असुन, यावल नगर परिषदच्या माध्यमातुन शहरात कुठही औषद्य फवारणी व धुर फवारणी करण्यात यावी असे लेखी निवेदन मुख्याधिकारी यांना या आधीच देण्यात आले असतांना नगर परिषदच्या वतीने या संदर्भात कोणतीही उपाययोजना करण्यात आल्याचे दिसुन नसल्याने कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रसारामुळे यावल शहरातील सर्व प्रभागामध्ये दोन दिवसाआड कोरोना प्रतिबंधक औषध फवारणी व धुर फवारणी करण्यात यावी. या अतिशय गंभीर अशा विषयावर तात्काळ उपाययोजना न झाल्यास संबधीत आरोग्य अधिकारी व आरोग्य निरिक्षक यांच्यावर कलम२६९प्रमाणे म्हणजे एखाद्या रोगाचा प्रसार करण्यासाठी होणारी निष्काळजी पणाची कामे जी दुसऱ्या व्यक्तिचे आयुष्य धोक्यात आणु शकते व कलम२७० म्हणजे एखाद्या रोगाचा प्रसार करण्यासाठी केलेली निष्काळजी किंवा दुसऱ्या व्याक्तीचे आयुष्य धोक्यात येवु शकते ही दोन्ही कलम भारतीय दंड सहिंताच्या १४ व्या अध्याय अंतर्गत आहेत . ज्या मध्ये सार्वजनिक आरोग्य , सुरक्षा , आनंद ,शिष्टाचार आणी नैतिकतेवर परिणाम करणारे आहे. 

---Advertisement---

या सर्व कलमान्वये नागरी आरोग्याच्या दृष्टीने दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे . यावल ग्रामीण रुग्णाल्यातील उभारण्यात आलेली ऑक्सीजन बॅड ही शोभेची वस्तु, फैजपुर विभागाचे तत्कालीन प्रांत अधिकारी डॉ. अजीत थोरबोले यांनी कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेवुन अथक परिश्रम घेवुन लोकवर्गणीतुन सुमारे ७ लाख रुपये खर्चाचे ऑक्सीजन बॅडची उभारणी केली होती पण यातुन एका ही रुग्णाला उपयोग होतांना दिसुन येत नाही तरी प्रशासनाने परिस्थितीचे गांर्भीयाने लक्ष देवुन संबंधीत जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी या विषयाकडे लक्ष देवुन त्या दृष्टीने यावल शहरात२०बेडचे कॉविड सेंटरची उभारणी करण्याची गरज असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावल तहसीलदार कार्यालयातील निवडकणुक शाखेचे नायब तहसीलदार राहुल सोनवणे यांना दिलेल्या निवेदनावर मनसेचे जिल्हा अध्यक्ष चेतन अढळकर, विभागीय अध्यक्ष आबीद कच्छी , तालुका उपाध्यक्ष शाम पवार, शहराध्यक्ष किशोर नन्नवरे, विपुल देवरे यांच्या स्वाक्षरी आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---