---Advertisement---
जळगाव जिल्हा महाराष्ट्र राजकारण

मोठी बातमी : शिंदे गटातर्फे विविध महत्वाच्या नियुक्त्या, जळगावातील या दोन आमदारांचा समावेश

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ सप्टेंबर २०२२ । महाराष्ट्र्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांची शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाच्या नेते पदी नियुक्ती करण्यात आली आहे. याच बरोबर आमदार चिमणराव पाटील यांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यातील दोन नेत्यांना शिंदे गटात मोठे स्थान मिळाले आहे.

eknath shinde guwahati

अधिक माहिती अशी कि, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री आपल्या गटातील महत्वाच्या नियुक्त्या केल्या. यात चार नेत्यांची नेतेपदी नियुक्ती करण्यात आली. यामध्ये राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील , खासदार भावना गवळी, माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचा समावेश आहे.

याच बरोबर २६ जणांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ज्यात पारोळा-एरंडोल मतदारसंघाचे आमदार चिमणराव पाटील यांचा समावेश आहे. याच बरोबर अनिल बाबर, दादाजी भुसे, गोपीकिसन बाजोरिया, श्रीरंग बारणे, ज्ञानराज चौगुले, शंभुराज देसाई, भरत गोगावले, यशवंत जाधव, अर्जुन खोतकर, दीपक केसरकर, शीतल म्हात्रे, विजय नाहाटा, हेमंत पाटील, शहाजीबापू पाटील, शिवाजीराव आढळराव पाटील, शरद पोंक्षे, रवींद्र फाटक, संजय राठोड, उदय सामंत, तानाजी सावंत, सदा सरवणकर, राहुल शेवाळे, विजय शिवतारे, कृपाल तुमाणे, संध्या वढावकर यांचा समावेश आहे.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---