मोठी बातमी : टीईटी घोटाळ्यामुळे जिल्ह्यातील ६७ प्राथमिक शिक्षकांचे पगार राेखले
जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑगस्ट २०२२ । टीईटी घोटाळ्यामुळे जिल्ह्यातील ६७ प्राथमिक शिक्षकांचे पगार राेखले गेले आहेत. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी २०१९मध्ये गैरप्रकार झाला आहे. या घोटाळ्यात माध्यमिक व प्राथमिक दोन्ही विभागातील काही शिक्षक दोषी आढळून आले आहेत. यामुळे हे पगार रोखले आहेत.
जिल्ह्यात ६१४ जणांनी टीईटीचे बोगस प्रमाणपत्र मिळवल्याची माहिती शासनाकडे आहे. त्या अनुशंगाने कारवाई सुरू आहे. गेल्या आठवड्यात माध्यमिक विभागाच्या ७१ शिक्षकांचे पगार रोखण्याचे आदेश मिळाले होते. तर शनिवारी प्राथमिकच्या ६७ शिक्षकांचे पगार रोखण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांना मिळाले. शिक्षकांना बोगस प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी सक्रीय दलालांचीही चौकशी करण्यात येणार आहे. घोटाळ्यात जळगाव तालुक्यात प्राथमिकचे १९ शिक्षक आढळले. त्यात स्मिता सिसोदे (कै.जि.एन.चांदसरकर बालमोहन शाळा), देशमुख शरीनाबेगम (मिल्लत प्राथमिक स्कूल), राहुल वंजारी (सौ.के.जी.मनियार प्राथ. विद्यालय), रितेश वंजारी (सौ.के.जी. मनियार प्राथमिक विद्यालय), कल्पिता खोरे, रुकसाना तडवी, प्रशांत चौधरी, पूजा बागूल (पाचही शिक्षक छत्रपती शिवाजी विद्यालय), सद्दाम तडवी (श्री. स्वामी समर्थ विद्यामंदिर, कुसुंबा), अमोल कोल्हे (श्री संत मुक्ताबाई प्राथमिक विद्यामंदिर), दिनेश चव्हाण, शैलेश वाघ, सुनील बारेला, प्रशांत पाटील, वैशाली पाटील, तान्या भातकर, राजेंद्र जोगी (सर्व प्राथ. शाळा, म्हसावद).
तालुकानिहाय संख्या
जळगाव शहर व तालुका १९, अमळनेर व चोपडा प्रत्येकी ७, भुसावळ १०, चाळीसगाव, धरणगाव व रावेर प्रत्येकी २, एरंडोल व जामनेर प्रत्येकी ६, पाचोरा व यावल प्रत्येकी १, पारोळा येथील ४ शिक्षक.