जळगाव लाईव्ह न्यूज । १७ सप्टेंबर २०२२ । जळगाव जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये शेतात पाणी साचले आहे. या पावसामुळे किंबहुना शेतात पाणी साचल्यामुळे कापूस, मका, तूर, ज्वारी, बाजरी पिके आडवी झाली आहेत . कापसाच्या फुलपात्यांचा जमिनीवर खच पडला आहे. यामुळे कापसाच्या हाताशी आलेला पहिला बहर वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.
जळगाव जिल्ह्यात कित्येक ठिकाणी काल दोन तास जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे कित्येक शेतात एक ते दीड फुटापर्यंत पाणी साचलेले पाहायला मिळाले. जिल्ह्यातील कित्येक शेतकऱ्यांच्या शेतात असेच पाणी शिरल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात कित्येक ठिकाणी कपाशी परिपक्व झाली आहे. कापसाच्या पिकाला पाणी कमी हवं असतं मात्र ते वेळेवर हवं असतं. ज्या प्रकारच्या पाऊस गेल्या काही दिवसांपासून पडत आहे. यामुळे पिकाला गरजेपेक्षा जास्त पाणी मिळत आहे. यामुळे तयार झालेल्या कापूस खराब होत आहे. कित्येक ठिकाणी कापसाचे बोंडे काळे पडत आहेत.
कित्येक ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचले आहे. अशावेळी पिके पिवळी पडत आहेत. शेतांना तलावांचे स्वरूप आले आहे. पर्यायी कापूस, मका, तूर, ज्यारी, पीक, मोठ्या प्रमाणावर खराब होत आहेत.