⁠ 
रविवार, सप्टेंबर 22, 2024
Home | बातम्या | महापौरांचा मास्टरस्ट्रोक : मनपातील कामे कर्मचाऱ्यांचा अभावी रखडू नये यासाठी घेतला ‘हा’ निर्णय

महापौरांचा मास्टरस्ट्रोक : मनपातील कामे कर्मचाऱ्यांचा अभावी रखडू नये यासाठी घेतला ‘हा’ निर्णय

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


जळगाव लाईव्ह न्यूज । १ जून २०२२ । जळगाव शहर महानगरपालिका ४२ कर्मचारी 31 मे रोजी सेवानिवृत्त झाले. यामुळे आता मनपामध्ये केवळ हजार कर्मचारी काम करत आहेत. याचा फटका थेट कर्मचाऱ्यांच्या कामावर येणार असून यामुळे त्यांचे हाल होऊ नये यासाठी मनपामध्ये ३८ तरुण उमेदवारांची प्रशिक्षणार्थी म्हणून मनपा मध्ये वर्णी लागणार आहे. हा निर्णय महापौर जयश्री महाजन व आयुक्त विद्या गायकवाड यांनी संयुक्त रीत्या घेतल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

या ३७ प्रशिक्षणार्थींना सल्लागार पर्यवेक्षक म्हणून कामाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. बांधकाम विभाग व पाणीपुरवठा विभाग या दोन्ही विभागांमध्ये यांना सामील करून घेतले जाणार आहे. या दोन्ही विभागांवर आता कर्मचाऱ्यांची कमतरता भासणार नाही. मात्र जर ती भासली तर नवीन पर्याय देखील शोधला जाणार आहे.

तर झाले असे की, महानगरपालिकेत कर्मचाऱ्यांची संख्या ही प्रत्येक महिना निहाय कमी होत चालली आहे. साडेतीन हजारावर असलेली कर्मचारी संख्या आता एक हजारांवर आली आहे. शहरात सुमारे 6 लाख लोक राहतात. यांचा भार केवळ एक हजार कर्मचाऱ्यांवर असल्यामुळे मनपा कर्मचाऱ्यांवर मोठा ताण पडत आहे. ज्यामुळे कामे वेगाने होत नाहीयेत यासाठीच या रिक्त जागा भरण्यासाठी आकृतिबंध मंजूर करण्यासाठी पाठवला गेला आहे. मात्र त्याआधी नागरिकांच्या सोयीसाठी महापौर जयश्री महाजन यांनी हा निर्णय घेतला आहे

या निर्णय घेतल्यामुळे येथील बांधकाम विभाग आणि पाणीपुरवठा विभागामध्ये कमतरता भासणार नसून नागरिकांची कामे लवकरात लवकर होणार आहेत. यामुळे महापौर जयश्री महाजन यांचे सर्वदूर अभिनंदन केले जात आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह