⁠ 
मंगळवार, डिसेंबर 17, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | मनपा आयुक्त ऍक्शन मोडवर : उपमहापौरांच्या प्रभागात केली रस्त्यांची पाहणी

मनपा आयुक्त ऍक्शन मोडवर : उपमहापौरांच्या प्रभागात केली रस्त्यांची पाहणी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्युज | २५ मे २०२२ | मनपा आयुक्त विद्या गायकवाड यांनी बुधवारी सकाळी अचानक उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या प्रभागात जाऊन तिथल्या रस्त्यांची पाहणी केली. यावेळी त्यांनी रस्त्यांचा दर्जा तपासला. गेल्या वर्षभरापासून जळगाव शहरात केवळ उपमहापौरांच्या प्रभागात कामे झाले असल्याने या ठिकाणची पाहणी विद्या गायकवाड यांनी केली.

शहरात काही ठिकाणी विविध योजनेतर्ंगत रस्ते,गटारींची कामे सुरु आहेत. बर्‍याच वेळा गुणवत्ता पूर्ण कामे होत नसल्याची ओरड होते.त्यामुळे आता कामांच्या गुणवत्तेची तपसाणी करण्यासाठी मनपा प्रशासनाने ‘रिबॉण्ड हॅमर’मशीन खरेदी केली आहे.दरम्यान,आयुक्तांसह अभियंत्यांनी बुधवारी‘रिबॉण्ड हॅमर’मशीनद्वारे कॉक्रिटीकरण कामाच्या गुणवत्तेची तपासणी केली.काही ठिकाणी कामांबाबत गुणवत्तापूर्ण कामे करण्याच्या सूचना आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांनी तपासणीअंती दिल्या.


मनपा प्रशासनाच्यावतीने शहरातील काही भागांमध्ये गटारी,रस्ते,पेवरब्लॉक अशी कामे सुरु आहेत.रस्ते ,गटारींची कामे केली जातात.मात्र गुणवत्तापूर्ण कामे केली जात नाही अशा नागरिकांकडून तक्रारी प्राप्त होत असतात. परिणामी काही दिवसातच रस्त्यावर खड्डे दिसून येतात.त्यामुळे आता रस्ते ,गटारींच्या कामांची गुणवत्ता तपासण्यासाठी मनपा प्रशासनाने ‘रिबॉण्ड हॅमर’मशीन खरेदी केली आहे.या मशीनद्वारे कामाची गुणवत्ता तपासली जाते.दरम्यान,बुधवारी आयुक्त डॉ.विद्या गायकवाड,शहर अभियंता व्ही.ओ.सोनवणी,अभियंता नरेंद्र जावळे,मनोज वडनेरे,संजय नेमाडे यांनी मेहरुण व पिंप्राळा परिसरात पाहणी करुन येथे सुरु असलेल्या कामांची ‘रिबॉण्ड हॅमर’मशीनद्वारे गुणवत्तेची तपासणी केली. यात काही ठिकाणी दोष आढळून आल्याने मनपा आयुक्तांनी गुणवत्तापूर्ण कामांबाबत सूचना दिल्या आहेत.

मनपा आयुक्त विद्या गायकवाड या आयुक्त पदावर विराजमान झालेल्या पासूनच ऍक्शन मोडवर आहेत. त्या मोठ्या प्रमाणावर कारवाई करत आहेत. यामुळे त्यांच्या बाबत संपूर्ण जळगाव शहरामध्ये आदराची भावना वाढली आहे. याच बरोबर आदरयुक्त भीती देखील निर्माण झाली आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह