मनपाच्या लिफ्टला नाही कुणी वाली ; नागरिकांचे होत आहेत हाल
जळगाव लाईव्ह न्यूज । १० मे २०२२ । जळगाव शहर महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये गेल्या कित्येक महिन्यांपासून ‘लिफ्ट मॅन येणार’ अश्याशा घोषणा करूनही कर्मचार्यांच्या अभावी लिफ्ट मॅनची उपलब्धता होत नाहीये. मनपा इमारतीमध्ये लिफ्ट मॅन नसल्याने कोणीही नागरिक येऊन लिफ्टचा हवा तसा वापर करत आहे यामुळे इतर नागरिकांचे हाल होत आहेत.
कोणत्याही शासकीय इमारतीमध्ये नागरिकांच्या सोयीसाठी लिफ्ट मॅनची नियुक्ती करण्यात येते. मात्र मनपा प्रशासनाकडे नियुक्ती करण्यासाठी कर्मचारी नसल्याने नागरिकांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
मनपा मध्ये एकूण सहा लिफ्टस आहेत त्यापैकी दोन लिफ्ट स्वर्व्हिसिंग नेहमी बंद असतात. इतर चार लिफ्टपैकी केवळ एकाच लिफ्ट मध्ये लिफ्ट मॅन असतो. केवळ एकाच केलेल्या लिफ्ट मॅनच्या नियुक्ती मुळे कोणीही सर्रासपणे लिफ्टचा वापर करत आहे. लिफ्ट हवी तिथे थांबवली. आणि बाकीचे गेले उडत अश्या अविर्भावात काही नागरीक प्रवास करतात. यामुळे इतर नागरिकांना किंबहुना वृद्ध नागरिकांना लिफ्ट चा वापर करण्यासाठी जास्तीत जास्त वेळ थांबावे लागत आहे.