⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

मंडळ अधिकार्‍यावर हल्ला करणारा एक वाळू माफिया अटकेत !

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जुलै २०२३ । मंडळ अधिकार्‍यावरील हल्ला प्रकरणी यावल तालुक्यात एक वाळू माफियाला अखेर अटक करण्यात आली आहे. साकळीचे मंडळ अधिकारी सचिन जगताप दिनांक २६ रोजी हे आपल्या कर्तव्यावर असतांना ट्रॅक्टर मालक सुपडु रमेश सोळंके , ट्रॅक्टर वरील चालक आकाश अशोक कोळी आणी गोपाळ प्रल्हाद सोळुंके हे अवैधरित्या ट्रॅक्टरवर गौण खनिज वाळुची वाहतुक करून ट्रॅक्टर मधील वाळु खाली करत होते.

याप्रसंगी त्यांना महसूलच्या पथकाना थांबविण्याचे प्रयत्न केले. यानंतर सदर पथ ट्रॅक्टर ताब्यात घेवुन यावल कडे येत असतांना यावेळी कर्तव्यावर असलेले सचिन जगताप यांच्यावर वरील तिघांनी मिळुन मारहाण करीत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला .

या घटनेतील वाळु वाहतुकीचे ट्रॅक्टर पोलिसांनी ताब्यात घेतले असुन, गुह्यातील संशयीत आरोपी गोपाळ प्रल्हाद सोळुंके ( वय २८ वर्ष राहणार कोळन्हावी तालुका यावल ) यास दिनांक ३० जुन शुक्रवार रोजी रात्री कोळन्हावी या ठीकाणाहुन अटक करण्यात आली असुन , त्याच्या विरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास यावल पोलीस ठाण्यातील पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक सुनिल मोरे व पोलीस तपास करीत आहेत.