---Advertisement---
जळगाव जिल्हा जळगाव शहर महाराष्ट्र

भुसावळ शहराला चांगला नगराध्यक्ष देणार : आमदार संजय सावकारे

---Advertisement---

sanjay sawkare 1

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ फेब्रुवारी २०२३ । पालिकेच्या गेल्या निवडणूकीत मी मतदान मागण्यासाठी गेलोे होतो, नागरिकांना आमच्यावर विश्वास ठेवून भाजपला पहिल्यांदा पालिकेत सत्ता दिली. मात्र काही चूका आमच्याकडून झाल्या, यामुळे कामे प्रलंबीत राहिली. यामुळे आमदार निधीतून मोठ्या प्रमाणात निधी देवून शहरातील विकासात्मक कामे करण्याचा प्रयत्न केला आहे. आता वर्षभरापासून प्रशासकि राजवटीत चांगली कामे होत आहेत. आगामी काळात शहराला चांगले नेतृत्व देवू, यामुळे पून्हा भाजपला संधी द्यावी, असे आवाहन आमदार संजय सावकारेे यांनी केले. रविवारी मॉर्डनरोडवर पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. शहरातील मॉडर्न रोडवर 30 लाख रुपये निधीतून पेव्हर ब्लॉक बसवण्याच्या कामाचे रविवारी भूमिपूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी भुसावळ व्यापारी मंडळाचे अध्यक्ष राधेश्याम लाहोटी होते.

---Advertisement---

आमदार सावकारे म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासून आमदार निधी मी शहराला देत आहे. वास्तविक त्याची गरज भासायला नको होती. पालिकेचा स्वतंत्र निधीतून शहरात विकासकामे होणे अपेक्षीत होते मात्र दुर्देवाने ते पूर्णपणे झाले नाही. गत पालिका निवडणूकीत मी भाजपसाठी मतदान मागितले होते, लोकांनी विश्वास ठेवून सत्ता दिली मात्र काही चूका आमच्याकडून झाल्या. आता या चूका होणार नाहीत. आगामी काळात नगराध्यक्ष चांगला देवू. नगरसेवकांचीही टीम चांगली असेल. यामुळे राहिलेल्या विकासाचा सर्व अनुशेष भरुन काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. शहरातील नावाप्रमाणे मॉर्डर्न रोड होईल. कामात कोणतीही तडजोड होणार नाही, असे आश्वासनही आमदार सावकारे यांनी दिले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष राधेश्याम लाहोटी, माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, प्रा.दिनेश राठी, राजेंद्र आवटे आदींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचलन प्रा.प्रशांत पाटील यांनी केले.

नवीन रस्त्यावर स्वच्छता ठेवा
मॉडर्न रोडवर यापूर्वी डांबरीकरणाचे काम मंजूर झाले होते मात्र काम थांबले होते. यानंतर हे प्रकरण न्यायालयातही गेले. या कामाचा माजी नगरसेवक प्रकाश बतरा, अजय नागराणी आदींनी पाठपुरावा केला. यामुळे 30 लाखांचा निधीतून पेव्हर ब्लॉकचे काम मंजूर केले. या रस्त्याचे काम दोन दिवसांत सुरू होईल. व्यापार्‍यांनी नवीन रस्त्यावर कचरा टाकू नये, अशी अपेक्षाही आमदार सावकारेंनी व्यक्त केली.

यांची होती उपस्थिती
यावेळी गिरीष महाजन, किरण कोलते, बापू महाजन, सतीश सपकाळे, मुकेश पाटील, महेंद्रसिंग ठाकूर, व्यापारी केशव गेलानी, विजय मोहनानी, खुशाल जोशी, गोपीचंद लूल्हा, सुरेश वासवानी, अजय माखीजा, रवी बजाज आदींसह सर्व व्यापारी उपस्थित होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---